वर्धा : हिंगणी वन परिक्षेत्रातील वडगाव शिवारातील नदीपात्रात रात्रीच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह दिसून आला. ही माहिती मिळताच वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. सकाळी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.घनदाट जंगल असल्याने मृतदेह तेथून वन कार्यालयात आणून शव विच्छेदन करण्यात आले. हा बिबट्या आठ ते नऊ महिन्यांचा असल्याचे सांगण्यात येते. कुजलेल्या अवस्थेत तो आढलून आल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे. मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनीही पाहणी केली. व्हिसेरा पुढील तपासणी साठी पाठविण्यात आला आहे.