देवरी येथे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांची भाऊबीज साजरी

0
16

देवरी,दि.२१- देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रातील आशावर्कर आणि गट प्रवर्तक यांनी आमदार सहसराम कोरोटे यांचेसह भाऊबीज काल सोमवारी (दि.२०) भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी केली.

स्थानिक कोरोटे भवन येथे आयोजित या भाऊबीज कार्यक्रमाचे केंद्रस्थानी आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे, देवरी तालुका महिला कॉंग्रेस अध्यक्ष सुनंदा बहेकार, जि.प. सदस्य विमल कटरे, छबु उके, छाया नागपुरे, सालेकसा पंचायत समिती सभापती  प्रमिला गणवीर, सालेकसा पंचयात समिती सदस्य वीणा कटरे, देवरी पंचायत समिती सदस्य भारती सलामे, अनुसया सलामे,  सामाजिक कार्यकर्त्या सीमा कोरोटे, मुल्लाच्या सरपंच कल्पना बागडे, देवरीच्या नगरसेविका सुनीता साहू, मोहन डोंगरे, शकील कुरेशी, कल्पना डोंगरे, शालू कुथे जिल्हा सचिव आशा वर्कर, उत्तम मरकाम,  होसलाल रहागडले, दिपक(राजा) कोरोटे, शेखर कनोजिया, छाया मडावी,अनवंता आचले, संदीप महोबिया, कुलदिप गुप्ता, प्रशांत कोटागंले, प्रदीप देशमुख, बळीराम कोटवार, संदीप भाटिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार कोरोटे यांनी आशावर्कर आणि गट प्रवर्तक यांना साडी व मिठाई देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन माजी पंचायत समिती सदस्य ओमराज बहेकार यांनी केले.