अर्जुनी मोर. 🙁 सुरेंद्रकुमार ठवरे) तालुक्यातील येरंडी/ देव. ग्रामपंचायत मध्ये आज तारीख 28 सरपंच पदाचे पदग्रहण व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये जनतेमधून निवडून आलेल्या सरपंच दीपक कुंभरे यांचा पदग्रहण तर उपसरपंच पदी विकास चवरे अविरोध निवडून आले.
तालुक्यात एकमेव ग्रामपंचायत येरंडी /देवलगाव ची निवडणूक पाच नोव्हेंबरला घेण्यात आली. व सात नोव्हेंबरला निकाल घोषित करण्यात आला होता. नऊ सदस्य व सरपंच एक असे दहा पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीपूर्वी तीन सदस्य अविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत भाजप काँग्रेस पॅनलचे सरपंच पदासह दहाही उमेदवार निवडून आले होते हे विशेष, तर दुसऱ्या पॅनलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. सरपंच पद हे भाजपाकडे तर उपसरपंच पद काँग्रेस पॅनल कडे असे यापूर्वी ठरविण्यात आल्याने निवडणूक शांततेत पार पडली होती. आज झालेल्या सरपंच पदग्रहण व उपसरपंच निवडणुकीत सरपंच दीपक कुंभरे यांचा पदग्रहण व सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडणुकीत विकास चवरे हे अविरोध उपसरपंच पदी घोषित करण्यात आले. यावेळी सरपंच दीपक कुंभरेे नवनिर्वाचित उपसरपंच विकास चवरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देवलाबाई कोवे ,निशिकांत तागडे, ऐश्वर्या रंगारी, सुनील पंधरे, इंदिराबाई उईके ,जिजाबाई बोरकर, नेमीचंद राऊत, समीक्षा रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते ,ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या पदग्रहण व उपसरपंच निवडीची प्रक्रिया नायब तहसीलदार क्षीरसागर, तलाठी चौधरी, ग्रामसेविका वाढई, यांनी पार पाडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी व्यंकट खोब्रागडे, रत्नदीप दहिवले, लैलेश शिवणकर, अनिल दहिवले, नरेश खोब्रागडे, दिलवर रामटेके, बालकदास बोरकर, रत्नदीप मेश्राम, यादवराव कोवे, भीमराव कुंभरे, योगेंद्र रंगारी, गिरीधारी बोरकर, यांनी परिश्रम घेतले होते.