सडक अर्जुनी:--तालुक्यातील गिरोला(हेटी)येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी नव वर्षाचे शुभपर्वावर १ जानेवारीपासून दोन दिवसीय”मामा-भाचा”यात्रेला सुरुवात होत आहे.गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते यांचे संकल्पतेने दरवर्षी नव वर्षाचे पहिल्या दिवशी अठरा वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येते.धार्मिक व पर्यटनदृष्ट्या या स्थळाचे महत्व असल्याने यंदाही निसर्गरम्य वातावरणात धार्मिक वसांस्कृतिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतील. गिरोला पासून अवघ्या एक किमी.अंतरावर जंगलात “टेंभरूण”प्रजातीची दोन उंचचउंच झाडे आहेत.यातील मोठे झाड “मामा”आणि लहान झाड म्हणजे “भाचा”चे प्रतीक म्हणून ओळखले जाते.ही झाडे भाविकांची श्रध्दास्थान असून या देवस्थानाचे मदतीकरीता दरवर्षी देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते आणि परिसरातील ग्रामस्थांनी अठरा वर्षापूर्वी यात्रेला सुरुवात केली.यात्रा नव वर्षाचे पहिल्या दिवशी भरत असल्याने यात्रेकरू धार्मिक श्रध्देसह नव वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात.मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षाने हे देवस्थान विकासापासून कोसो दूर आहे.त्यामुळे नववर्षाचे पहिल्या दिवशी या यात्रेत सहभागी होणा-या भाविकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो.यंदा १ जानेवारी रोजी घटस्थापना व ज्योत प्रज्वलन करुन यात्रेची सुरुवात होणार असून २ जानेवारीला दहीकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेत प्रवचन,उत्सव व नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेचे आयोजन सरपंच उमराव कापगते व देवस्थान समिती सदस्य शामराव कापगते,सेवकराम चांदेवार,आशिष संग्रामे,दामोधर बांगरे,आशिष दरवडे,प्रशांत कापगते,रामदास दरवडे,रमेश कापगते,हरिचंद वलथरे,राजाराम बांगरे,गुलाब पुसाम,हेमेंद्र तागडे,हेमराज कुंभरे,चंद्रशेखर लंजे,फुलीचंद कापगते,महेंद्र खैरे,विजय माने,मंगर वलथरे,दिगांबर तागडे,उमेश तागडे,सुनिल कापसे व समस्त गिरोला ग्रामवासी यांनी केले आहे. गिरोला येथील सरपंच उमराव कापगते सन २००२ ते २००७ दरम्यान उपसरपंच पदावर सन २००२ मध्ये “मामा-भाचा” यात्रा भरविण्याचा संकल्प उमराव कापगते यांनी केला.तेव्हापासून सदर यात्रा दरवर्षी नववर्षाचे पहिल्या दिवशी कोरोना काळ वगळता निरतंर भरविण्यात येते.सन २००९ते२०१७ पर्यंत सरपंच,सन २०१७ते २०२२ ग्रामपंचायत सदस्य आणि हल्ली १० जानेवारी २०२२ पासून उमराव कापगते सरपंच म्हणून कार्यरत आहेत.सरपंच उमराव कापगते यांना देवस्थान समिती व ग्रामस्थाचे सहकार्य लाभत असल्याने दरवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात येते.