गावकऱ्यांनी थांबवली खासगी लोहखाणीकरिता होणारी वृक्षतोड

0
13

.गावालगत लोहखाण आम्हाला मान्य नाही, ग्रामपंचायतने नोंदविला विरोध

 लोहखाण सुरू होण्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू

गोंदिया,दि.09- आमगाव तालुक्यातील  मानेगाव येथील गुरे चराई व इमारती लाकडासाठी राखीव असलेल्या वनभूखंडावर अवैधरित्या वनविभागाने लोहखाणीकरीता केलेली वृक्षतोड गावकऱ्यांच्या निदर्शनात येताच गावकऱ्यांनी एकत्र येऊन अवैध वृक्षतोडीचा विरोध करीत आज 9 जानेवारीला वृक्षतोड थांबवली.मानेगाव येथील गट क्र. ५५३ एकूण १७.०४ हे. आर. हे वनभूखंड  गुरे चराई व इमारती लाकडासाठी राखीव असून वर्ष २०२२ मध्ये सदर भूखंड खासगी कंपनीला लोहखनिज  उत्खननासाठी परवानगी ग्रामपंचायत मार्फत देण्यात यावी यावर  दि.१७/०५/२०२२ रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती.गावकऱ्यानी सर्वानुमते हा ठराव नामंजूर करून सदर जागा निको जायस्वाल इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड नागपूर या कंपनीला लोहखनिज उत्खननासाठी देण्यात येऊ नये असे ठराव पारित केला होता.

गोंदिया जिल्हात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सेवा संस्थेने  (Sustaining Environment & Wildlife Assemblage) सुद्धा गावकऱ्यांना पाठबळ देत सदर भूखंड खाजगी कंपनीला लोहखनिज  उत्खननासाठी  नाही देण्यात यावी यावर विरोध व्यक्त करत विविध शासकीय विभागाशी पत्र व्यवहार केला होता.

परंतु  आज ०९ जानेवारीला सदर वनभूमीवर अवैधरित्या वृक्षतोड होत असल्याचे निदर्शनात आले.यावरून वनविभाग सदर वनभूखंडावर वृक्षतोड करून हि जागा निको जायस्वाल इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड नागपूर  यांना लोहखनिज उत्खननासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवलेला आहे.सदर भागात विविध प्रकारच्या  दुर्मिळ वन्यजीवांचे  वास्तव्य आहे.सदर वन भूखंडावरील वृक्षतोड थांबवण्यात आली नाही तर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिला आहे.

सदर विरोधात गावातील प्रकाश मेश्राम ग्रा.प. सरपंच मानेगाव , सिमाबाई बोपचे ग्रा.प. उपसरपंच मानेगाव, मीनाबाई मरसकोल्हे अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती, हितेश मेश्राम उपाध्यक्ष वन व्यवस्थापन समिती, यशवंतराव राहंगडाले, ललिताबाई नागोसे, ग्यारेस फुंडे,ज्योती मेश्राम, ममता मेश्राम, छोटेलाल फुंडे, हिरालाल बोपचे, देवचंद फुंडे, मोरेश्वर बोपचे, निलेश मरसकोल्हे, परमानंद मेश्राम, जीवनलाल बोपचे, रुपचंद फुंडे, घनश्याम पारधी, ठामेश्वर बोपचे, ईश्वरदार मानकर, गुडेश बिसेन, धर्मेंद्र फुंडे, जितेंद्र बोपचे व अन्य गावकरी  उपस्थित होते.