वंचित व गोरगरिबांच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा आहे:- डॉ. भारत लाडे

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

अर्जुनी मोर. -जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले ,तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, या संत तुकारामाच्या ओळीने आपण प्रभावीत झालो. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कमाईतील विसावा हिस्सा दानधर्मात द्यावा या विचाराने प्रेरित होऊन आपण समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आपण समाज हिताला जास्त प्राधान्य देऊन अंधांना दृष्टी, निराधारांना आधार व गरीब होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणारी मदत हे कार्य अविरत सुरू ठेवून जेवढे शक्य होईल तेवढे सामाजिक कार्य करणार, कारण वंचित व गोरगरिबांच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा आहे असे भावनिक प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी तथा गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. भारत लाडे यांनी केले.
स्थानिक जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विशाल प्रांगणात तारीख 21 जानेवारी ला डॉ. भारत लाडे मित्रपरिवार, तालुका काँग्रेस कमिटी तथा समता फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासनी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्त तपासणी व अनाथ मुलांना जीवनापयोगी साहित्य वाटपाच्या भव्य कार्यक्रमात डॉ. लाडे बोलत होते.
डॉ. भारत लाडे सामाजिक कार्यकर्ता तथा उपाध्यक्ष राष्ट्रीय युवा काँग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मागील पंधरा वर्षापासून समाजाच्या हिताचे अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 21 जानेवारी 2024 रोज रविवारला डॉ. भारत लाडे मित्रपरिवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अर्जुनी मोर व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी, चष्मे वितरण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिर आणि तालुक्यातील अनाथ मुलांना जीवन उपयोगी साहित्य वाटप शिबिर घेण्यात आला. दरम्यान यात तालुक्यातील एकूण 20 कुटुंबातील अनाथ बालकांना जीवनोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये विक्रमी 122 रक्त दात्यानी रक्तदान केले.
नेत्ररोग निदान शिबिरात 1357 रुग्णांची मोफत नेत्रचिकित्सा करण्यात आली. त्यापैकी 637 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. व यातील 345 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.
तसेच ज्या रुग्णांचे रक्तगट माहिती नव्हते अशा एकूण 361 रुग्णांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली.
रक्त संकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई रुग्णालय रक्तपेढी गोंदिया यांनी केले. रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर लगेचच आकर्षक टी-शर्ट व प्रमाणपत्र भेट देण्यात आले. आलेल्या सर्व रुग्णांसाठी अल्पपोहाराची व चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रामुख्याने, घनश्यामभाऊ धामट,जि.प.सदस्या कविताताई कापगते, जि.प.सदस्य श्रीकांत घाटबांधे ,उमाकांत पालीवाल,माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, कृष्णा शहारे, , बाबा बागडे, नगरसेविका शीलाताई उईके, नगरसेवक सर्वेश भुतडा, अतुल बन्सोड,अनिल दहिवले,केतन मेश्राम, प्रमोद पाऊलझगडे, विजयसिंह राठोड, संजय जयस्वाल, अशोक चांडक, प्रशांत अवचट्टे, हेमंत भांडारकर, संजय नाकाडे, पुरुषोत्तम, घाटबांधे, आशिष कापगते, लोकेश हुकरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते संचालन आश्विन गौतम यांनी केले .