नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात झुक झुक गाडीचे थाटात लोकार्पण

0
20

अर्जुनी मोर=जगाच्या इतिहासात नवेगावबांध ची राष्ट्रीय उद्यान म्हणुन ओळख आहे. निसर्गाने येथे भरभरुन सौंदर्य दिले आहे. या राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहो. बच्चेकंपनीच्या झुक झुक गाडी ला हिरवी झेंडी दाखवुन माझे हातानी लोकार्पण झाले.यापेक्षा दुसरा आनंदच होवु शकत नाही.नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरात योग्य नियोजन करुन या परिसराचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. विकास आराखड्यानुसार नौकाविहार, इंटरप्रिटेशन हाॅल, डोमेस्टिक बर्डस झु, विविध प्रकारचे गार्डन, लाईट शो,असे वैविध्य असणारे पर्यटन या ठिकाणी करु या करिता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. याच सहकार्यातुन संकुल परिसरात दर्जेदार सेवा सोयी वाढवुन पर्यटन वाढवु असे आवाहन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी. राजकुमार बडोले यांनी केले आहे.
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुल परिसरात 26 जानेवारी रोजी झुक झुक गाडीचे आगमन झाले. त्यावेळी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करताना माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल होते .तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे, शारदाताई बडोले ,पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, तंटामुक्त अध्यक्ष हरिचंद्र चांदेवार, एकनाथ बोरकर ,वैशाली बोरकर, उद्योगपती बबलू जैन, माजी सैनिक नीलमचंद पंधरे, उद्योगपती नितीन पुगलीया, नवेगाव बांध फाउंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, सचिव रामदास बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, इंजि. सुनील तरोणे प्रामुख्याने उपस्थित होते.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुल परिसरात दिनांक 26 जानेवारी रोजी झुक झुक गाडीचे आगमन झाले व पर्यटनामध्ये बच्चे कंपनीला व मोठ्यांना सुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला. आज नवेगाव बांध पर्यटन संकुलातील ग्रीन पार्क उपहारगृह परिसरामध्ये इंजि. सुनील तरोणे यांच्या कल्पनेतून व यांच्या प्रयत्नाने एका बॅटरी चलीत झुक झुक गाडी चे संचालन करण्यात आले. या झुक झुक गाडी ला माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी हिरवी झेंडे दाखवली.ही झुक झुक गाडी बॅटरीवर संचालीत एक इंजीन व तीन डब्बे असून प्रत्येक डब्यात ४ ते ६ बच्चे पर्यटक बसू शकतात.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात हिलटाप गार्डन, ग्रीनपार्क उपहारगृह व आता झुक झुक गाडी ही सर्व ईंजी. सुनिल तरोणे यांचे कल्पकतेतुनच साकार होत असुन या उद्यानातील संकुल परिसराचा कायापालट करुन पर्यटक वाढविण्याचे दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे सुनिल तरोणे यांनी सांगितले.