चिचगड,दि.२८. चिचगड येथील पाच वर्षापासून बंद असलेले बांबू आणि टिंबर डिपो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी देवरी पंचायत समिती सभापती अंबिका बंजार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन केली आहे.परिसरातील लोकांना शेतीसाठी आणि घर कामासाठी लागणारे बांबू, जलाऊ बिट्या ,आणि इमारतीला लागणारे लाकूड डिपोतुन घेऊन यायचे.पण आता डिपो बंद झाल्यामुळे चिचगड जंगल परिसरातील बास आणि टिंबरचा माल हा नवेगावबांध आणि डोंगरगाव डेपो इथे घेऊन जातात. त्यामुळे चीचगड परिसरातील गरजू लोकांना माल घेण्यासाठी नवेगावबांध किंवा डोंगरगाव डेपो ठिकाणी जावे लागते.सगळ्या शेतकऱ्यांना जाऊन आणणे शक्य होत नाही. कारण की नवेगाव आणि डोंगरगाव डेपो हे चिचगड पासून जवळपास 40 किलोमीटर इतके लांब आहे. तसेच चिचगड परिसर हा मोठा परिसर असून ह्या परिसरात पुष्कळसे गावे येतात .त्यामुळे गावकऱ्यांना घर कामासाठी बांबू लागतो किंवा घर बांधण्यासाठी इमारतीला पण लाकुड लागतो.त्यामुळे लवकरात लवकर बांबू आणि टिंबर डिपो सुरू करण्यात यावा अशी मागणी सौ अंबिका बजार सभापती पंचायत समिती देवरी यांनी जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत वनमंत्री ,प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक,उपवनसंरक्षक,प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगाव बांध वनपरिक्षेत्र अधिकारी चिचगड यांना निवेदनातून केली आहे.