एमडीटी को अपनाओ, कुष्ठरोग को दुर भगाओ या संदेशाने शहर दुमदुमले

0
13

स्पर्श कुष्ठरोग अभियानाची प्रभातफेरीने जनजागृती

गोंदिया( दि.2 फेब्रुवारी) : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.अभियाना दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. लवकर निदान, तत्पर उपचार ह्या संदेशाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी नागरिकांना केले आहे.

कुष्ठरुग्ण हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी म्हटले आहे. लवकर निदान,तत्पर उपचार केल्यास कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. ह्या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान निमित्त जिल्हास्तर,तालुकास्तर,प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरुन प्रभातफेरी,रांगोळी व मँरॉथान रन वे ह्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे.

दि. 31 जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत जनजागृती पर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .प्रभात फेरीचे उद्घघाटन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे , सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत यांनी हिरवी झेंडी देवुन सुरुवात केली. यावेळी जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, डॉ. टेंभुरकर ,निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती जैस्वाल, कुष्ठरोग विभागाचे नंदकिशोर चकोले, भुपेंद्र भोकासे, संतोष बोरकर, रंविद्र जाधव,जगदिश पंचभाई, अशोक मुंडपीलवार, अनिल पडोले, रविंद्र श्रीवास, अधिपरिचारीका निलु चुटे,कल्याणी चौधरी तसेच केटीएस विभाग व कुष्ठरोग विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रभात फेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून निघून स्टेडियम मैदान, जयस्तंभ चौक भागात विविध संदेश देवुन शहर दुमदुमले त्यात प्रामुख्याने एमडीटी को अपनाओ-कुष्ठरोग को दुर भगाओ, ना शाप है ना पाप है-कुष्ठरोग जंतुका वरदान है, दिसताच चट्टा-डॉक्टरांना भेटा,कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या- सन्मानाने स्विकार करु या, कुष्ठ कि जांच कराए- ईलाज कर दुर भगाए, जनमन की शक्ती से कुष्ठरोग मिटेगा बस्ती से  असे विविध संदेश जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग़्णालयातील नर्सिंग कॉलेजचे ए.एन.एम व जी.एन.एम.चे विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी आदि उपस्थित होते.