तिरोडा:- मादक पदार्थांसारखेच आजच्या युगात व्यसन म्हणून परिवर्तित झालेल्या नॉन-सबस्टन्स अॅडिक्शन किंवा पदार्थविहीन सवयींच्या आहारी गेल्याने आयुष्यातली मुख्य गोष्ट गमवावी लागते. ती म्हणजे कुटुंबाचा आणि मित्राचा सहवास. ही व्यसने दूर हटवून कुटुंबीयांना; मित्रांना जास्त वेळ दिल्यास, एखाद्या छंदात रमल्यास शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळींवरील आरोग्य सुधारणे सहज शक्य होईल.कोणतेही व्यसन म्हणजे दीर्घकाळ टिकणारी, पुन्हा पुन्हा उद्भवणारी एक मनोशारीरिक व्याधी असते. तो पदार्थ वापरल्याशिवाय किंवा ती कृती केल्याशिवाय त्या पदार्थाचे अथवा कृतीचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला स्वस्थ वाटत नाही. आपल्या व्यसनांचे हानिकारक परिणाम माहिती असूनही ती गोष्ट सतत केली जाते. त्याचबरोबर व्यसनांमधून निर्माण होणारे बदल मेंदूमध्ये दीर्घकाळ टिकतात. व्यसन म्हणजे मेंदूचा एक जटिल शारीरिक विकार असतो, तसाच तो पक्का मानसिक आजारही असतो असे व्यसन दूर करण्यास बाबा जुमदेवजिच्या माध्यमातून सोपे झाले असे प्रतिपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले. विधानसभा क्षेत्रातील भंबोडी येथे सेवक संमेलन व आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत ५.०० लक्ष रुपये किमतीचे सभामंडप बांधकाम पूर्ण झाले असून सदर वास्तूचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने कृउबास उपसभापती विजय डिंकवार, सेवक प्रदीप चौधरी, रमेश टेंभरे,युवराज टेंभरे, शालिकराम बिसेन, राजू ठाकरे, विरचंद नागपुरे, एकनाथ सपाटे,हरिदास दहेकर, खेमराज पारधी, भूमेश्वर पारधी, सहादेव बनकर, राजेंद्र काटुके, छबीलाल कटरे, दिनेश माहुरे, लंकेश्वर ठाकरे, प्रल्हाद शहारे व रंजित बिसने व मोठ्या संखेने सेवक उपस्थित होते.