कलपाथरी मध्यम प्रकल्पात संपादित केलेल्या भूखंडधारकांना पट्टे वाटप करा – आ.विजय रहांगडाले

0
17

तिरोडा:– गोरेगाव तहसील कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा सभा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गोरेगाव येथे श्रीरामपूर पुनर्वसन क्षेत्रातील नागरिकांचे आखीव पत्रिका तय्यार करून त्यांचे नावे मालकी हक्क मिळणे, खोलगट भागातील प्लॉट बदली करून पट्टे देणे, खुल्या शासकीय जागेचे परिसीमन करून विकास करणे, कलपाथरी मध्यम प्रकल्पाअंतर्गत सोनारटोला, भगतटोला, ओकाटोला या गावातील प्रकल्पबाधित शेतक-यांना पट्टे वाटप करून मालमत्तापत्रक तय्यार करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. वाघ प्रकल्पाचा पुजारीटोला धरणाच्या बुडीत क्षेत्रातील संपादित झालेल्या पठानटोला, निंबा, हलबीटोला, चीचटोला येथील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले परंतु त्यांचे गट वर्ग-२ मधून वर्ग -१ मध्ये रुपांतरीत करण्यात आले नाही.सन १९७६ पूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९७६ व १९८६ नुसार पात्र प्रकल्पबाधित वाटप केलेल्या भोगवटदार वर्ग -२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्याचे निर्देश बैठकीत निर्देश दिले गेले.या बैठ्कीमध्ये प्रामुख्याने जि.प.सदस्य लक्ष्मण भगत, प्रवीण पटले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार के.के.भदाणे, ना.तहसीलदार नागपुरे, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, सा.बा.उपभियंता टेंभूर्ने, खंडविकास अधिकारी सुबोध पाटील,  आशिष बारेवार,  रेवेन्द्र बिसेन, हिरालाल रहांगडाले, रेखलाल टेंभरे,मन्साराम मारबदे व संबधीत यंत्रणेचे मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.