संविधानाबद्दल अज्ञानी असल्यामुळे जातीय जनगणना झाली नाही – प्रदीप ढोबळे

0
14
भंडारा -:  हा देश संविधानाने चालतो कुठल्याही जाती-धर्माच्या ग्रंथाने चालत नाही संविधानाबद्दलचा अज्ञान असल्यामुळेच जातीय जनगणना होऊ शकली नाही असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष  इंजि. प्रदीप ढोबळे यांनी समारोप सभेत केले.
   19 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात निघालेल्या संविधान बचाव संघर्ष समितीच्या संविधान जनजागृती यात्रेचे दिनांक 26 फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता सार्वजनिक वाचनालय, भंडारा येथे जाहीर  सभेच्या माध्यमातून समारोप करण्यात आले.
       सभेच्या अध्यक्षस्थानी रोशन जांभुळकर जिल्हाध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती तर मार्गदर्शक प्रदीप ढोबळे संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ, प्रा. मधुकरराव उईके केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,  दीनानाथ वाघमारे संयोजक संघर्ष वाहिनी, चंद्रशेखर टेंभुर्णे कार्याध्यक्ष, ओबीसी जनगणना परिषद मुख्य संयोजक सदानंद इलमे, अचल मेश्राम, डॉ. बाळकृष्ण सार्वे,सुरेश खंगार उमेश कोराम, आदिवासी नेते अजबराव चिचामे, सौ. मंगला वाडीभस्मे महिला आघाडी अध्यक्षा ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य  मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सदर वेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.
जनतेतून निवडून आलेले नेते गुलामगिरीत गेले आहेत, या देशात सांस्कृतिक वाद निर्माण केले जात आहेत. सरकार दबाव निर्माण करत आहे जे विरोध करतात त्यांना इडी व इन्कम टॅक्सचा धाक दाखवून जेलमध्ये टाकण्याचा षडयंत्र केले जात आहे, जबरदस्तीने धार्मिक विचार डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत दीनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केले.
तर सरकारने जाती धर्मात वाद निर्माण केले, समाजात आरक्षणाच्या नावाने झगडे लावले जात आहे.  महाराष्ट्रात अनैतिक सरकार बसले असून झुंडशाही व झुंजशाही निर्माण केली गेली असा आरोप मधुकरराव ऊइके यांनी केला.
या देशातील जे उच्चवर्णीय आहेत ते सातत्याने आरक्षणाचा विरोधात करीत असतात, संविधानात नमूद केल्याप्रमाणे जो मागासवर्गीयांचा समूह आहे आणि ज्याला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांनाच रिझर्वेशन देण्यात यावं अशी तरतूद आहे, त्यानुसारच मंडल आयोगाने आम्हाला मागासवर्गीय ठरवलेलं आहे. आणि जर आमचं मागासलेपण ठरवलेला नसेल तर सरकार जातीय जनगणना का करत नाही असा सवालही उपस्थित केला? हा देश संविधानाने चालतो कुठल्याही धार्मिक ग्रंथाने चालत नाही. संविधानाबद्दल आपण अज्ञानी असल्यामुळे जातीय जनगणना आतापर्यंत झाली नाही. भारताच्या संविधानात सामाजिक न्यायाचे तत्व आहेत, हा 85% असलेला बहुजन समाज 15 टक्के असलेल्या समाजाच्या बरोबरीने यावा यासाठीच संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे असे मत प्रदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषणात कॉम्रेड सदानंद इलमे यांनी  सांगितले की भंडारा जिल्ह्यातील या संविधान जनजागृती रॅलीमुळे गाव खेड्यात चेतना निर्माण झाली असून जवळपास प्रत्येक तालुक्यात 24 छोटेखानी सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये युवकांना व नागरिकांना संविधान व आपले हक्क समजावून सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके यांनी केले तर आभार  चंद्रशेखर टेंभुर्ने यांनी मानले. कार्यक्रमाची शेवट राष्ट्रगीताने करण्यात आली.
सदर कार्यक्रमात शशिकांत भोयर महासचिव संविधान बचाव संघर्ष समिती, माजी शिक्षणाधिकारी के .झेड .शेंडे, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, चंद्रशेखर मेश्राम, वामनराव गोंधुळे, श्रीकृष्ण पडोळे, मोरेश्वर तिजारे, शुभदा झंजाळ, ज्ञानचंद जांभुळकर, अरुण जगनाडे, रमेश शहारे, बीसेन महाराज, रोशन उरकुडे , सूर्यकांत हुमने, इंजिनीयर रूपचंद रामटेके चंद्रशेखर खोब्रागडे दिलीप ढगे अरविंद रामटेके अनिल कान्हेकर जयंत झोडे प्रेमानंद गोस्वामी मिलिंद करंजेकर डॉ. सुरेश खोब्रागडे सुरेंद्र बनसोड भगीरथ धोटे अश्विनी भिवगडे इत्यादीं सोबत मोठ्या संख्येने महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.