खरेदी विक्री संघावर माजी मंत्री केदार यांचे वर्चस्व

0
2

अर्जावरील अनुमोदकाची खोटी सही भोवली
भाजप उमेदवार नरेंद्र मानकर यांचा अर्ज रद्द
कळमेश्वर  : कळमेश्वर तालुक्यातील (Kalameshwar taluka) खरेदी विक्री समिती च्या व्यवस्थापन (union election) कमिटीची निवडणूक सन 2024 ते 29 साठी घेण्यात येत असून दिनांक 27 ला नामांकन पत्राची छाननी करण्यात आली. त्यात भाजपा आघाडीचे नरेंद्र मानकर यांचा वैयक्तिक मतदारसंघातील अर्जावर अनुमोदक यांची खोटी सही असल्यामुळे छाननी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आला. भाजप समर्थित उमेदवार नरेंद्र मानकर यांच्या अर्जावर अनुमोदक म्हणून जयदेव कोहाड या सभासदाच्या नावाची सही करण्यात आली होती. परंतु छाननी दरम्यान सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने शिवाय स्वतः अनुमोदक जयदेव कोहाड यांनी ही सही माझी नसल्याचे सांगताच नरेंद्र मानकर यांचा अर्ज त्याच क्षणी रद्द करण्यात आला.

राज्यात मोठी व नामांकित ओळख कळमेश्वर च्या खरेदी विक्री समितीला असून राज्य शासनाचा पुरस्कारही या समितीला मिळालेला आहे. खरेदी विक्री सहकारी समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री सुनिल केदार (former minister Kedar) गटाचे सहकार पॅनल उभे असून भाजपानेही आपले पॅनल उभे केले आहे सदर (union election) निवडणुकीमध्ये दिनांक 26 फेब्रुवारी पर्यंत एकूण 25 नामांकन आले होते. त्यातील भाजप ने पाच उमेदवार उभे केले होते. सेवा सहकारी संस्था मतदार संघात भाजपला उमेदवार न मिळाल्याने माजी मंत्री सुनील केदार समर्थित सहकार पॅनलचे सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून13 उमेदवार बिनविरोध निवडून येणे निश्चित झालेले आहे. त्याच प्रमाणे महिला मतदार संघ मधून 2 प्रतिनिधी निवडून येणे निश्चित झालेले आहे. उर्वरित वैयक्तिक मतदार संघ, भटक्या विमुक्त जाती जमातीमतदार संघ,अनुसूचित जाती जमाती मतदार संघ , इतर मागासवर्गीय या मतदारसंघात निवडणूक होत असून, यात वैयक्तिक मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती मतदारसंघ व इतर मागासवर्गीय मतदार संघ या मतदारसंघात प्रत्येकी एक जागेसाठी निवडणुक होण्याची शक्यता आहे. सहकार गटाचे 13 उमेदवार बिनविरोध निवडून येणार असून, भाजपकडे तालुक्यात सेवा सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी नसल्यामुळे सदर मतदार संघातून उमेदवार उभे करू शकले नाही. त्याच प्रमाणे महिला मतदार संघ मध्ये महीला उमेदवार उभे करु शकले नाही.