सुंदर गाव स्वच्छ गाव पुरस्काराने इर्री ग्रामपंचायत सन्मानित

0
21

गोंंदिया,दि.02- जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने पार पडलेल्या सरपंच मेळाव्यात तालुक्यातील ग्राम पंचायत इर्री ला सुंदर गांव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम तसेच जिल्हा परिषद सभापती यांच्या हस्ते तालुकास्तरावरील आर.आर.आबा पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.इर्री ग्रामपंचायत सरपंच देवांनंद अभिमन गड़पायले, उपसरपंच  भाऊलाल लहू तरोने, ग्रामसेवक रामेश्वर जमईवार, ग्राम पंचायत सदस्य मनीराम उपवंशी, दिलीप ब्राम्हणकर, जितेंद्र वरखड़े, सौ. उर्मिला उपवंशी, सौ. सयवंता नागपुरे, सौ.वर्षा चौहान, सौ. धंवनता वरखड़े, सौ. चित्ररेखा चौधरी, ग्राम रोजगार सेवक नरेशकुमार ठकरेले, ग्राम पंचायत कर्मचारी सुनील ठकरेले यांनी हा पुरस्कार स्विकारला.यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर,पंचायत समितिचे सभापती मुनेश रहांगडाले, गट विकास अधिकारी आनंदराव पिंगले, विस्तार अधिकारी सुरेश निमजे उपस्थित होते.