ईंदोरा/खुर्द चे आरोग्य सेविका प्रिती वडीचार यांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सम्मानित

0
16

जागतिक महिला दिनी जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
गोंदिया : आरोग्य विभागामार्फत २०२3-२4 वर्षासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण स्व. यशवंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे सोमवार (ता.11 मार्च) रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले , महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम व जिल्हा परिषदेचे सदस्य मा. छबुताई उके, मा. रचनाताई गहाणे, उषाताई मेंढे यांचे उपस्थीतीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत ,बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर उपस्थित होते. आरोग्यसेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल परिचर्या व सुश्रुषा सेवेची जननी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी गौरविण्यात येते.
आधुनिक परिचर्याचे जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या नावाने पुरस्कार दिला जात असून आरोग्यसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यरत पारिचारिकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणुन फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार जिल्हा स्तरावर प्रदान करण्यात येतो.
परिचर्या व सुश्रुषा सेवा संवर्गातील सर्व पारीचारिका,स्टाफ नर्स,आरोग्य सेविका, अधिसेविका व आरोग्य सहाय्यिका या प्रत्येक संवर्गातुन तीन पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
यावर्षी स्टाफ नर्स संवर्गातून प्रथम पुरस्कार ग्रामीण रुग्णालय गोरेगावचे रेखा दोनोडे , द्वितीय पुरस्कार जिल्हा क्षयरोग रुग्णालयाचे विणा शिवणकर, तृतीय पुरस्कार जिल्हा क्षयरोग केंद्राचे नेहा चिचमलकर यांना देण्यात आला. आरोग्य सेविका संवर्गातून प्रथम पुरस्कार तिरोडा तालुक्यातील उपकेंद्र ईंदोरा/खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाकचे प्रिती वडीचार , द्वितीय पुरस्कार सालेकसा तालुक्यातील उपकेंद्र पिपरिया प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचे हेमलता फुंडे तर तृतीय पुरस्कार गोरेगाव तालुक्यातील उपकेंद्र शहारवाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडाचे रंजु रंगारी यांना या वेळी प्रदान करण्यात आला. आरोग्य सहाय्यिका संवर्गातून प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांधचे रेखा चाचेरे तर द्वितीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्लाचे धर्मशिला सोनटक्के हे मानकरी ठरले.मनोरुग्ण तज्ञ पारिचारिका संवर्गातून के.टि.एस.सामान्य रुग्णालयाचे डिम्पल मारवाडे यांना त्यांच्या योगदाना बद्दल देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली खोब्रागडे तर आभार डॉ.नितीन वानखेडे यांनी मानले.जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माध्यम व विस्तार- अधिकारी प्रशांत खरात, अधिपरिचारिका कल्याणी चौधरी व के.टि.एस.सामान्य रुग्णालयाचे निलु चुटे यांनी मोलाची कामगिरी केली.

तिरोडा- तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुकडी/डाक अंतर्गत उपकेंद्र ईंदोरा/खुर्द चे आरोग्य सेविका या पदावर कार्यरत असलेल्या प्रिती वडीचार यांना आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सेविका म्हणून अविरतपणे सेवा निभावत असल्याबद्दल जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने जिल्हा आरोग्य प्रशासनाने सम्मानित केले. आरोग्य विभागामार्फत २०२3-२4 वर्षासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण स्व. यशवंतराव नाईक सभागृह येथे दि.11 मार्च रोजी संपन्न झाला. प्रिती वडीचार यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला असुन यावेळी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले आहे. प्रिती वडीचार यांनी राष्ट्रिय आरोग्य अभियानात कंत्राटी तत्वावर 6 वर्ष तर नियमित आरोग्य सेविका पदावर 9 वर्ष असा एकुण 15 वर्षापासुन क्षेत्रीय गावपातळीवर लोकांना गुणवत्तापुर्वक आरोग्य सेवा देत आहे.त्यांनी सर्व आरोग्य कार्यक्रम जसे हिवताप,हत्तीरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, साथरोग, कुटुंब कल्याण, माता व बाल आरोग्य,सिकलसेल ई.विविध आजाराबाबत लोकांना प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण  व गृहभेटी दरम्यान उपचारात्मक आरोग्य सेवा देत आहे. शासनाच्या विविध योजना जसे प्रधानमंत्री मातृ वंदन , जननी सुरक्षा,मानव विकास,आयुष्मान भारत योजनेचा लाभ लोकांपर्यत पोहचवित आहे.लसीकरण सत्रातुन बालक व गरोदर मातांना लसीकरण व आरोग्य सेवा देत आहे.कोरोना काळात बाहेरील भागातुन येणार्या लोकांचे सर्वेक्षण, अलगीकरण,तपासणी यावर कामे केलेली आहे. कार्यक्षेत्रातील लोकांचे व मुलांचे कोरोना लसीकरणाचे  उद्दिष्ट पुर्ण केले आहे.