भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

0
8
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा,  दि.८: निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच  दिव्यांग मतदारांना आणि 85 वर्षाहून अधिक मतदारांना गृह मतदानाचा हक्क उपलब्ध करून दिला. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात 536 मतदारांनी काल गृह मतदान करत मतदानात हक्क बजावला. आयोगाच्या वतीने पहिल्यांदाच गृह मतदान हा उपक्रम घेण्यात आले त्यात भंडारा जिल्ह्यातील मतदारांनी सक्रिय सहभाग घेतला.

 जिल्ह्यात काल  ७ एप्रिल २०२४ ला  निवडणुकीचा भाग म्हणून गृह मतदानाच्या पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यात ३३ पथकांनी गृह मतदानाचे कार्य पार पाडले. ८५ वर्षाहून अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि भंडारा येथील दिव्यांग मतदारांना घरपोच मतदानाची सुविधेचा लाभ घ्यायचा होता,अशीं सुविधा प्रथमच भारतीय निवडणूक आयोगद्वारे करण्यात आली.

          त्यामध्ये भंडारा विधानसभा क्षेत्रात 8 चमू तर साकोली मध्ये 13 चमू,तुमसर मध्ये १२ चमू अश्या एकूण 33 चमुनी गृह मतदानाचे कार्य आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडले.त्यामध्ये भंडारा तालुक्यातून 139 साकोली तालुक्यातून १८९ तर तुमसर तालुक्यातील 208 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला .विशेषता ८५ वर्षांवरील मतदारांमध्ये स्त्रियांची संख्या लक्षणीय होती.तसेच दिव्यांग बंधू भगिनींनी सुद्धा मतदानाचा हक्क नोंदवला .यावेळी गृह मतदान करताना आयोगाने दिलेले सूचनांचे पालन नियुक्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी केले तसेच  गोपनीयतेने गृह मतदान  करण्यात आले.