सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे ८१ जोड्यांचे विवाह संपन्न

0
26

गोंदिया-दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा/तेढा यांच्या वतीने सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ८१ जोड्यांची नोंदणी करून विवाहबद्ध झाली. दरवर्षी रामनवमीच्या शुभ दिवशी कोणतेही शुल्क न घेता सामुहिक विविः सोहळ्याचे आयोजित करण्यात येते. यंदा या विवाह सोहळाचे हे ३२ वे वर्ष आहे. विवाह करणाऱ्या प्रत्येक वर- वधू ना जीवनावश्यक वस्तु, वस्त्र तसेच सोन्याचे मंगळसूत्र देण्यात आले. वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे हिकालाची गरज आहे असे विधान संस्थेचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले.

दरवर्षी अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान सामाजिक न्याय विभागाचा फुले, शाहू, आंबेडकर पुरस्कार प्राप्त करणारी मध्य भारतातील पहिली धार्मिक संस्था म्हणून या संस्थानाचे नाव लौकिक आहे. ज्यामध्ये सर्व धर्मांची समानता पाळून कार्य केले जाते. मांडोदेवी देवस्थान हे मध्य भारतातील प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र असून नियमित 3 ते 4 हजार भाविक व पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी ५० हून अधिक दुकाने आणि हॉटेल्स असून रोजगार प्राप्त करत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी आरोग्य सेवा व इतर मार्गदर्शन शिबिरांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. दररोज विवाह सुविधा उपलब्ध असून यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० जोड्यांचे विवाह संपन्न केले जाते. आजपर्यंत या संस्थेमार्फत हजारोहून अधिक जातीय व आंतरजातीय विवाह संपन्न झाले आहेत.

या विवाह सोहळ्याला योग्यरीत्या पूर्ण करण्यासाठी संथेचे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले तर सचिव जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सह सचिव कुशन घासले, सदस्य डॉ. जितेंद्र मेंढे शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल आणि मंदिर चे पुजारी पंडित अयोध्यादास  महाराज परिश्रम घेतले.