बाजार समिती सभापती उपसभापती निवडणुकीत बळीराजा पॅनलचा झेंडा

0
14
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमसर:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया मंगळवार दि.२८ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात पार पडली.त्यात सभापती व उपसभापती पदांची निवडणुक प्रक्रियेला दुपारी एक वाजता सुरुवात झाली.त्यात सभापती पदा करीता बळीराजा पॅनल कडुन भाऊराव तुमसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.तर उपसभापती पदा करीता बळीराजा पॅनलचे रामदयाल पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सदर सभापती पदा करीता एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने येथे भाऊराव तुमसरे यांची सर्वानुमते अविरोध निवड झाली. उपसभापती पदाच्या निवडणुकीत सुध्दा एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने उपसभापती पदी रामदयाल पारधी यांची सुध्दा सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. सदर सभेवेळी सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती रामदयाल पारधी,किरण अतकरी, हरेद्र रहांगडाले,राजेश पटले, रामप्रसाद कटरे,कलाम शेख,प्रमोद कटरे ,राजकुमार माटे, रविंद्र बाभरे,अशोक पटले, अरविंद कारेमोरे,शिवशंकर समरीत,गणेश बावणे,दिलीप गजभिये,भोजराम वंजारी,वैशाली पटले, शारदा गाढवे, एकुन अठरा संचालकांनी सहाभाग घेतला होता.

पॅनलने तिन जागा मिळवल्या, एक अपक्ष असे एकुन अठरा संचालक निवडुण आले

सदर निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, निवडणुक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक विलास देशपांडे, निलेश जिभकाटे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीष धोटे, राजेश्वर चोरघडे,मुलचंद नागपूरे आदींच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. कृषी उत्पन्न बाजार  समिती निवडणुकीत भाऊराव तुमसरे यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा जनहित पॅनल ने बाजार समितीच्या १८ जागेपैकी १० जागा मिळवत सत्ता मिळवली आहे.तर आमदार राजु कारेमोरे यांच्या पॅनलने चार जागा व माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पॅनलने तिन जागा मिळवल्या, एक अपक्ष असे एकुन अठरा संचालक निवडुण आले होते.