परमपूज्य डॉ. बाबासाहेबांचा अपमान आजिबात सहन करणार नाही – पंकज रहांगडाले

0
7

गोंदिया : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी गोरेगाव जनसंपर्क कार्यालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला. जितेंद्र आव्हाडने फोटो नुसता फाडलाच नाही तर जमिनीवर फेकून दिला. जितेंद्र आव्हाड यांनी समाजविघातक कृत्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड वर कार्यवाही करण्याबाबतचे निवेदन तहसीलदार गोरेगाव यांना देण्यात आले. यावेळी पंकज रहांगडाले जिप अध्यक्ष, विश्वजीत डोंगरे अनुसूचित जाती जिलाध्यक्ष, संजय बारेवार तालुकाध्यक्ष, डॉ लक्ष्मण भगत जिप सदस्य, मनोज बोपचे सभापती पस समिती, पुरुषोत्तम जनबंधु (अ.जा) तालुकाध्यक्ष गोरेगांव, रामेश्वर महारवाड़े, पस. गोरेगांव, शैलेश नंदेश्वर, जिप सदस्य, गोंदिया, नितिन कटरे उपाध्यक्ष भाजपा गोरेगांव, सतीश रहांगडाले महामंत्री भाजपा गोरेगांव, राजेंद्र शहारे पदाधिकारी, दुर्योधन शहारे, दिपक बोपचे, मानिक भगत, ब्रिजलाल पारधी. मुनेश्वर रहांगडाले, किशोर मेश्राम, सोनाली साखरे, सरपंच, केशरीचंद मेश्राम, राजा कटरे, तेजेश्वरी मेश्राम, सलीम खरे सरपंच घोटी इत्यादी भारतीय जनता पक्षाचे नेते उपस्थित होते.