शाश्वत शेतीसाठी “मिश्र पीक” पद्धतीचा अवलंब करा-तालुका कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मौजे खरोळा येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी सभा उत्साहात
वाशिम,दि.१ -खरोळा येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभा उत्साहात घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनाली ठाकरे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे, कृषी सहाय्यक एम.डी.सोळंके हे उपस्थित होते.
यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रकाश कोल्हे म्हणाले, वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतात लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत म्हणतात. या पद्धतीत बहुतांश तृणधान्य व कडधान्यांचा पिकांचे मिश्रण असते. परंतु इतर पिकांचाही या पद्धतीत अंतर्भाव सुध्दा काही शेतकरी करतात. सर्वसाधारणपणे या पद्धतीत एकावेळी दोन पिके लावतात परंतु काही वेळा तीन, चार अगर त्यापेक्षाही जास्त पिके घेतली जातात.या पद्धतीचा जिरायती, बागायती, व कायम स्वरूपाच्या पीक-मळ्यांमध्ये अवलंब केला जातो. ही पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. याकरिता शाश्वत शेतीसाठी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री.प्रकाश कोल्हे यांनी केले.
 यावेळी कृषी सहाय्यक एम.डी. सोळंके यांनी सोयाबीन अष्टसूत्री विषयी मार्गदर्शन केले. यामध्ये घरच्याच सोयाबीन बियाणाचा पेरणीकरिता वापर करणे, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे व बीज प्रक्रिया बाबतचे प्रात्यक्षिक स्वतः करून दाखविले तसेच बीज प्रक्रिया करणे, पेरणीच्या पद्धतीमध्ये बदल करणे, दहा वर्षा आतील वाणांचा वापर करणे, रासायनिक खताच्या मात्रा विद्यापीठाने शिफारस केल्या त्याप्रमाणे वापरणे इत्यादी विषयी मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी गावातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.