आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून वैद्यकिय उपचाराकरिता २.४० लक्ष मंजूर

0
8

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील पात्र गरजू व्यक्तींना मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत २.४० लक्ष रुपयाची मदत प्राप्त झालेली असून त्यामध्ये प्रामुख्याने नितीन अशोक चौधरी मु.एकोडी यांच्यावर सेन्ट्रल हॉस्पिटल गोंदिया येथे उपचार सुरु असतांना १.०० लक्ष रुपये, खुशाल पिंजरघरे मु.तिरोडा यांना १.०० लक्ष रुपये व  विजय मारोती पटले मु.पालडोंगरी यांचेवर सुअरटेक हॉस्पिटल नागपूर येथे उपचार सुरु असताना ४०.०० हजार रुपये वैद्यकीय उपचारकरिता मदत करण्यात आल्यामुळे रुग्णांच्या परिवारास आर्थिक मदत मिळाली आहे