जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

0
14
नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे तात्काळ करा : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील, तालुका गोंदिया येथील ग्राम चुटिया येथे चक्रीवादळामुळे व पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाल्याची बातमी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना प्राप्त झाली होती. क्षेत्रातील अनेक नागरिकांनी झालेल्या नुकसानी बाबत त्यांना कळविले होते. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या ग्राम चुटीया येथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान अनेक घरांची पडझड झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना नुकसानी भरपाई मिळावी अशा सूचना त्यांनी अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत. नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नुकसानग्रस्त कुटुंबांना पंकज रहांगडाले यांनी दिले. यावेळी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती योपेंद्रसिंह(संजू) टेंभरे, अजित टेंभरे, दुर्गाप्रसाद ठाकरे, दिलीप बोपचे, गणराज पटले, व ग्रामस्थ उपस्थित होते.