जागतिक बाल मजुरी विरोधी दिनानिमीत्त कायदेविषयक साक्षरता शिबीर

0
17
वाढदिवसाच्या शुभेच्छा

        गोंदिया, दि.14 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ तसेच ऑक्सीजन शिकवणी वर्ग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक बाल मजुरी विरोधी दिवस’ निमीत्ताने 12 जून 2024 रोजी जिल्हा न्यायालयात कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. शबाना अंसारी, लक्ष्मीकांत बावनथडे व अशोक कारधा उपस्थित होते.

       ‘जागतिक बाल मजुरी विरोधी दिवस’ निमित्ताने आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात मार्गदर्शन करतांना ॲड. शबाना अंसारी म्हणाल्या, आपल्या परिसरामध्ये जर आपल्याला कोणत्याही ठिकाणी बाल मजदूर काम करतांना दिसून आले तर त्यांना त्वरित पुनर्वसन केंद्रामध्ये किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया या ठिकाणी पोहचविण्यात यावे, जेणेकरुन त्या बाल मजदूर मुलांचे समुपदेशन करुन त्यांना शिक्षण देवून योग्य दिशा व सक्षमीकरण करुन त्यांना बालपणाचा आनंद घेवून जगता येणार असे त्यांनी सांगितले.

        जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के.वाळके यांनी बाल मजदूरी व त्याचे दुष्परिणाम, बाल मजदूरी करण्यास लावणाऱ्या बाबी, सामाजिक उदासीनता, मानवीय स्वार्थीवृत्ती, कौटुंबिक उदासीनता, बाल मजदूरी करण्यास जाणून भर देण्यात येत असते कारण बाल मजदूर हा काम करताना कुठलाही विरोध करीत नाही व काम सतत करीत राहतो. बाल मजदूरी खरच दूर करायची असेल तर समाजाला फक्त कागदावर विरोध करुन चालणार नाही तर त्याकरीता योग्य ती उपाययोजना करावी लागेल व समाजाला आपली राष्ट्रीय व नैतिक जबाबदारी पार पाडावी लागेल. त्याचप्रमाणे कायदेशीर बाबींचे अजून कठोरपणे पालन करावे लागणार तरच आपण बाल मजदूर मुलांचे हरवलेले बालपण पुन्हा बहाल करु शकतो असे ते म्हणाले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश पारधी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अशोक कारधा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी अधीक्षक पी.बी.अनकर, कनिष्ठ लिपीक ए.एम.गजापुरे, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एस.डी.गेडाम, पी.डी.जेंगठे, के.एस.चौरे, एल.ए.दर्वे, लेखापाल आलेशान मेश्राम, शिपाई बी.डब्ल्यू.पारधी, आर.ए.मेंढे, सरतीमा भगत यांनी  मोलाचे सहकार्य केले.