राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान करना-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-आम आदमी पार्टी

0
302
वाढदिवसाच्या शुभेच्छा

चंद्रपूर : ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान राबवण्याची जिम्मेदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची होती. हे अभियान राबवून झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आपल्या जिम्मेदारीचा जनु विसरच पडला की काय असे चित्र चंद्रपूर प्रशासकीय भवन मधील अन्न पुरवठा विभागात पहायला मिळाले. आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे हे एका कामानिमित्त कार्यालयात गेले असतांना कार्यालयातील टेबलवर देशाचे राष्ट्रध्वज फाडून त्याचा पोछा बनवून फरशी पुसायसाठी ठेवले असे दिसले. या संदर्भात तिथे उपस्थित जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याशी संवाद साधल्या नंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.प्रत्यक्षात ही बाब त्यांच्या वारंवार निदर्शनास येऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत होते. यावरून या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जिम्मेदार जिल्हा पुरवठा अधिकारी व‌ कर्मचारी आहे.हे ग्रुहीत धरून या संदर्भात आज रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या विरुद्ध एफ आय आर नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.
यावेळेला आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी, जिल्हा कोषाद्यक्ष सरफराज शेख, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसूम शेख,   जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, राज नगराळे,  शहर संघटनमंत्री संतोष भाऊ बोपचे, मनीष राऊत, अनुप तेलतुबडे,अमित बोरकर,आदित्य नंदनवार, विकास खाडे, इत्यादी उपस्थित होते.