महिलाओ पर अत्याचार कब तक ? गणरायाचे थेट सवाल

0
57

गोंदिया – दिवसेंदिवस देशात महिलांवर होणारे आत्याचार हे वाढतच चाललेले आहेत. त्यात बद‌लापूर येथे घडलेल्या चिमुकली वर घात असो किंवा बंगाल येथे महिला डॉक्टरावर झालेला बलत्कार आज महिला असुरक्षित असल्याचे भावना त्यांच्या मनात आहे. या विषयी शासन उदासिक असून ठोस असा कायदा नसल्यामुळे आरोपींना शासनाची भिती राहिली नाही त्यामुळे ते कृत्य करून मोकाट फिरतात आहेत . पण या सर्व प्रकारावर आळा बसावा. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, महिलांना शासनाने सुरक्षतेची हमी दयावी. याकरिता गणरायांच्या समोर महिला अत्याचार या आशयाचे देखावा साकारून गणरायाच्या माध्यमाने शासनाला भेट प्रश्न केला आहे की महिलाओं पे अत्याचार कबतक ? यामाध्यमातून आदर्श कॉलनी गोंदिया येथील प्राची प्रमोद गुडधे यांनी शासनाला जाग करण्याचे काम केलं आहे .