निंबा येथिल मामा तलावाची पाळ फुटली

0
706

गोरेगाव– तालुक्यातील ग्राम निंबा क्षेत्रात दि. ०९ ते ११ सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी झाली त्यामुळे येथिल गट क्रमांक ४७० माजी मालगुजारी तलावात मोठ्याप्रमाणात पाणी जमा झाला आहे त्यामुळे तलाव ओव्हर फ्लो झाला व पाळीला छोटा छिद्र पळला होता. तो मोठा होऊ नये म्हणून जवळच्या शेतकऱ्यांनी बोरीमध्ये माती भरून पाण्याचा प्रवाह बंद करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पाणी जास्त असल्याने प्रवाह वाढून हळूहळू तो छिद्र मोठा झाला व दि. १३ सप्टेंबर शुक्रवारला जोरात पाऊस आल्यामुळे माजी मालगुजारी तलावाची पाळ फुटली व जवळच्या शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले आहे.
याची तक्रार सरपंच वर्षाताई पटले यांनी मृदा व जलसंधारण विभाग गोंदिया येथे केली असता संबंधित जलसंधारण अधिकारी तुषार मानकर व ऊके यांनी दि. १४ सप्टेंबर शनिवारला तलावाची पाहणी केली.
यावेळी वर्षाताई पटले सरपंच ग्रा.प. निंबा, रमेश पंधरे पं.स. सदस्य गोरेगाव, पुरुषोत्तम कटरे उपसरपंच ग्रा.प. निंबा, नंदलाल ऊईके सदस्य ग्रा.प. निंबा, संजय शहारे ग्रा.प. सदस्य निंबा, मालताताई भगत सदस्य ग्रा.प. निंबा, बुधराम बिजेवार अध्यक्ष तंटामुक्त समिती निंबा, विजय पटले, छगन कुमडे, भैयालाल कुमडे, टेकराज कुमडे, गणेश भगत, प्रेमलाल मसे, तेजराम ठाकरे, देवचंद ठाकरे, गावकरी व शेतकरी उपस्थित होते.
पाण्याचा प्रवाह वाढून पाळ जास्त फुटू नये म्हणून ग्राम पंचायत च्या पुढाकारातून शेतकरी व गावकरी मिळून सिमेंट च्या बोरीमध्ये माती दगड भरून कसाबसा तात्पुरत्या स्वरूपात तलावाची पाळ सुधारली असून पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. पण प्रवाह असाच सुरू राहिल्यास पाळ आणखी जास्त फुटण्याची शक्यता आहे.
या माजी मालगुजारी तलावाला पाण्याचा मोठ्याप्रमाणात येना आहे. जंगलालगत असल्याने जंगलातील पाणी तलावातच येत असतो पण या तलावाला पाळ मजबूत नसल्याने त्याची पाळ फुटली असून खुप पाणी वाया जात आहे.
जर पाळ फुटून पाणी वाहत राहिला तर जंगलातील जनावरे व गावातील जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होईल म्हणून संबंधित विभागाने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून पाळ सुधारावी जेणेकरून पाणी वाया जाऊ नये अशी मागणी गावकरी व शेतकऱ्यांकडून होत आहे.
संबंधित विभागाकडून लवकरात लवकर निधी मंजूर करून सदर तलावाच्या फुटलेल्या पाळीचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी सरपंच वर्षाताई पटले यांनी प्रशासनाकडे केली आहे.