गोरेगाव ITI येथे संविधान मंदिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

0
133

गोंदिया, दि.24 :  15 सप्टेबर 2024 रोजी ऐलिफन्टस् टेक्निकल हायस्कुल मुंबई येथून उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांचे हस्ते राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दुरदृश्य प्रणालीद्वारे संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.

         शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोरेगाव येथे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बबलु पटले व श्रीकांत चौधरी यांचे हस्ते संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. 13 ते 15 सप्टेबर 2024 पर्यंत संस्थेमध्ये संविधान महोत्सव साजरा करण्यात आला. या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये संविधानावर आधारित पोस्टर पेंटींग स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आले. 14 सप्टेबरला प्राध्यापक किशोर पटले यांनी संविधान विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे प्राचार्य विलास मात्रे, शिल्पनिदेशक सर्वश्री जयंत काटकर, योगेश बरडे, ललीत पुजे, वरिष्ठ लिपीक रामकृष्ण मेहेर तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले.