अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

0
96

अमरावती -जिल्ह्यातील चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यातील अनेक भागांत आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली नसली, तरी अनेक गावांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती गावकऱ्यांनी दिले आहे. भूकंपामुळे हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.