ग्रामपंचायत अधिकारी युनियन चे वार्षिक अधिवेशन व पतसंस्थेची आमसभा उत्साहात

0
618

गोंदिया : जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांचे वार्षिक अधिवेशन व पतसंस्थाची आमसभा मयूर लान कटंगी कला येथे २९ सप्टेंबरला जि.प. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या डायरीचे विमोचन मुकाअ मुरगानंथन, उपमुकाअ गोविंद खामकर, आनंद िपिंगळे, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच पदोन्नतीप्र्राप्त ग्रामपंचायत अधिकार्‍यांचे सत्कार सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम तर प्रमुख अतिथि उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन, कार्तिक चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविकेतून जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांची विपरीत परिस्थितिमध्ये ही काम करण्याची कार्यकुशलता व होणार्‍या स्वार्थ साध्य न झाले मुळे खोट्या तक्रारी बाबत वस्तुस्थिती शी अवगत करवून भविष्यात लोकाभिमुक कामे करण्याची साडे तीनशे लोकांकडून ग्वाही दिली .यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर यांनी आपल्या कार्यकाळात आलेले अनुभव त्यात ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कामात स्मार्ट वर्क करण्याची गरज प्रतिपादित केली. त्यांनंतर ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था ची आमसभा जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी अहवाल वाचन करून चर्चा केली. त्यात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आली त्यात सामाजिक उत्तरदायित्व जपणारा निर्णय म्हणून सर्व सम्मती ने सभासद कल्याण निधि अंतर्गत मृत्यू पश्चात परिवाराला कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी, यांना २ लक्ष, तर एनपीएस धारक दीड लक्ष ,ओपीएस धारक १ लक्ष देण्याचे निश्चित करण्यात आले. तर गंभीर आजारी सभासद यांना १ लक्ष ना परतावा मदत करण्याचे निर्णय घेण्यात आले. संचालन कुलदीप कापगते यांनी तर प्रास्ताविक कमलेश बिसेन व आभार शैलेश परिहार यांनी मानले .
मोठ्या संख्येने ग्रा.पं. अधिकारी उपस्थिती
ग्रामपंचायत अधिकारी यांचे वार्षिक अधिवेशन व पतसंस्थाची आमसभा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,सचिव कुलदिप कपगते, उपाध्यक्ष.सचिन कुथे, महिला उपाध्यक्ष भारती वाघमारे, कोषाध्यक्ष शैलेश परिहार, सहसचिव योगेश रुद्रकार, राज्य कौन्सिलर योगराज बिसेन, महिला राज्य कौन्सिलर सौ.रजनी शहारे , प्रसिद्धी प्रमुख रामेश्वर जमईवार , जिल्हा संघटक रितेश शहारे, जिल्हा संघटक सुरेश वाघमारे, जिल्हा संघटक टिकाराम जनबंधु, कायदे सल्लागार प्रदीप ठाकरे, कायदे सल्लागार किशोर आचले, जिल्हा निमंत्रक नरेंद्र गोमाशे, जिल्हा महिला निमंत्रक कु.नम्रता रंगारी, संघटनेचे उपाध्यक्ष दयानंद फटिंग, कोषाध्यक्ष भागेश्वर चौव्हान, संचालक रामेश्वरजमईवार, सचिन कुथे, सुनील पटले, रविंद्र अंबादे, ओमेश्वर बिसेन, निशा टेंभरे, तारेश कुबडे , नरेंद्र अतकरी, कु.ज्योती बिसेन, गायककुमार ठाकुर , निशीकांत मेश्राम ओमेश्वर बिसेन संदीप मेंढे, ओमेश्वर कापगते, पवनकुमार हातझाडे , तारेश कुबडे , रविंद्र अंबादे, शिवाजी राठोड , राजेश रामटेके, विजय बिसेन, कु.सरीता ब्रम्हवंशी , शैलेश परिहार , सुमेद बंसोड यासह ३००च्या जवळपास ग्रा.पं. अधिकारी उपस्थित होते.