बोलीभाषा टिकविणे प्रत्येकाची जबाबदारी-सरिता गाखरे

0
41
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भोयर, पवार समाजाचा स्नेहमिलन सोहळा*
*काटोल*. अलीकडे बोलीभाषा लुप्त होत चालली आहे. प्रत्येक समाजनिहाय त्यांची वेगळी भाषा आहे. ती भाषा टिकविण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी बोली भाषेतून संवाद साधणे आवश्यक आहे. तेव्हाच ही भाषा तग धरून राहील, असे मत वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय भोयर, पवार महासंघाच्या काटोल शाखेतर्फे रविवारी (दि. 29) राजा भोज बालसंस्कार भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्तांचा सत्कार आणि समाजाचा स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी . छिंदवाडा (म. प्र.) येथील हॉर्टिकल्चर कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विजय पराडकर होते. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, कारंजा नगरपंचायतचे उपाध्यक्ष भगवान बोवाडे, नामदेव बारंगे, हभप लिलाधर चोपडे, विजय डोंगरे, भगवान बन्नगरे, महासंघाच्या काटोल शाखेचे अध्यक्ष प्रा. वसंत खवसे, व्यावसायिक श्रावण खवसे, ग्रामगीताचार्य पिंगला देशमुख, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. जयश्री चौधरी, कृषितज्ज्ञ विजय डोंगरे, कांचन रमधम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गाखरे यांनी, व्यस्ततेतून समाजासाठी प्रत्येकांनी वेळ देण्याचे आवाहन करीत समाज म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून विकासाची वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष मनोहर पठाडे यांनी केले. उद्घाटक चरणसिंग ठाकूर यांनी समाजाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. याप्रसंगी काटोल शाखेचे अध्यक्ष प्रा. वसंत खवसे यांच्यासह मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक दिलीप गाखरे, सेवानिवृत्त ग्रामसेवक गुरुदेव किनकर, मुख्यमंत्री माझी शाळा सुदंर शाळा अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आजनगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पठाडे, भोरगड येथील गजानन हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र काटोले, उमरी येथील जिल्हा परिषद शाळेतील नवोपक्रमशील शिक्षक चित्तेश्वर ढोले, देवग्राम येथील जीवनविकास विद्यालयाचे नवोपक्रमशील शिक्षक मदन ढोले यांच्यासह प्रगतीशील शेतकरी अनिल काटोले, ग्रामसेवक चंद्रकांत चोपडे तसेच गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. आयोजनासाठी सल्लागार प्रा. शेषराव बारंगे, सचिव डॉ. विलास फरकाडे, कोषाध्यक्ष अरुण मुन्ने, सहसचिव अर्जुन कडवे, ईश्वर घागरे, वासुदेव चोपडे, विजय डोंगरे, जगदीश खवसे, दिलीप गाखरे, प्रा. नरेंद्र कटरे, चिंतेश्वर ढोले, डॉ. नीलेश ढोबाळे, राकेश कासलीकर, मनीष कामडी तसेच महिला मंडळ आणि सल्लागार सदस्यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे
अध्यक्षीय भाषणातून डॉ. पराडकर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची वेळ वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. गावातील विद्यार्थ्यांना पुढे येण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा निर्माण होणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार करा. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घरातील वातावरण तसे तयार करा असे आवाहन करीत दुसऱ्या समाजातील प्रगती बघण्यापेक्षा स्वत:च्या समाजातील ‘आदर्श’ असलेले व्यक्ती डोळ्यासमोर ठेवण्याचा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
पहिला ‘समाजरत्न’ प्रदान
अखिल भारतीय भोयर, पवार महासंघाच्या काटोल शाखेतर्फे आयोजित सोहळ्यात नवराष्ट्र – नवभारतचे वृत्तसंपादक प्रा. डॉ. गणेश खवसे यांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजाप्रती बांधिलकी, शिक्षणक्षेत्रातील योगदान यासह क्षेत्रातील घेतलेल्या भरारीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्याचे हे पहिलेच वर्ष होय.