फरार अरोपीला त्वरित अटक करा, जयश्री महाकाल महिला सेवा समितीची मागणी

0
109

गोंदिया : माजी नगर सेवक व श्री महाकाल सेवा समिती अध्यक्ष लोकेश कल्लू एस. यादव यांच्यावर जानेवारी महिन्यात गोळी झाडून जीवे मारण्याच्या प्रयत्न करण्यात आला होता. त्या प्रकरणतील मुख्य आरोपी व सुत्रधार प्रशांत मेश्राम मागील आठ महिन्यांपासून मोकाट फिरत आहे. त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही. सदर आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्यावर हत्याचे प्रयास, खंडणी वसुली, टोळी बनवून शहरात दहशत माजवून नशाचे साहित्य, ड्रग्स, दारू, ब्लकमेलिंग सारखे गुन्हे याच्यावर व यांचा कुटुंब आणि सहकारी यांच्यावर आहेत. अशा अपराधिक प्रवतीचा व्यक्ती मोकाट फिरत आहे. त्यामुळे आम्हाला आपल्या कुटुंबाचे जीव धोक्यात घेवून जगावे लागत आहे. आम्ही वारंवार पोलीस अधिक्षक यांना निवेदन देवून सुद्धा आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी सतत सेशन कोर्ट, हायकोर्ट येथे अग्रिम जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून कोर्टाने जामीन नाकारले आहे. आरोपी हा मोक्का सारखे अपराधिक घटनेत लिप्त आहे आणि कधी छुप्या पद्धतीने कोणती मोठी घटना घडवून आणण्याच्या तयारीत असण्याच्या शक्येतला नाकारता येत नाही. त्यामुळे फरार आरोपीला त्वरित अटक करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन जयश्री महाकाल महिला सेवा समिती अध्यक्ष स्वाती लोकेश यादव यांनी उपविभागीय अधिकारी व पुलिस निरीक्षक गोंदिया शहर यांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.