*चान्ना व गोठणगांव येथे अभूतपूर्व महिला मेळावा*
अर्जुनी मोर : महीला ही सर्व शोधाची जणनी आहे.वर्तमान केंद्र आणी राज्य सरकारनी महीलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या. त्याचा फायदा महिला भगीनिंना मोठ्या प्रमाणात झाला आहे. एस.टी.बसमधे सवलत,उमेद व बचतगटाच्या माध्यमातुन महीलांचा औद्योगिक विकास, लघुउद्योगासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या अनेक योजनांच्या माध्यमातुन महीलांचा सर्वांगीण विकास ,अशा अनेक योजना विद्यमान सरकारनी दिल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांनी महिलांना आत्मनिर्भर बनविले त्यामुळे या योजना अवीरत सुरु ठेवण्यासाठी आपन महिलांनी भाजपा सरकारच्या पाठीसी उभे राहण्याचे आवाहण माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोर. विधानसभेच्या वतीने बोंडगावदेवी व गोठणगांव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत चान्ना/बाकटी, व गोठणगांव येथे आयोजित अभुतपूर्व महीला मेळाव्यानिमीत्य ता 5 आयोजीत कार्यक्रमात उदघाटक म्हणुन माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते.अध्यक्षस्थानी राष्टीय संपर्क प्रमुख विश्वमांगल्य सभा सौ.शुभांगी मेंढे होत्या.अतिथी म्हणुन जि.प सदस्य व गटनेते लायकराम भेंडारकर, चामेश्वर गहाणे, सीताबाई रहांगडाले, कृऊबा संचालिका शारदाताई बडोले, जि.प.सदस्य कविता रंगारी,उपसभापती होमराज पुस्तोळे, भाजपा तालुका अध्यक्ष विजय कापगते, लक्ष्मीकांत धानगाये, जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे, जयश्री देशमुख, निशा तोडासे, पं.स सदस्य नुतन सोनवाने, संदीप कापगते, कुंदाबाई लोगडे, लैलेश शिवनकर, व्यंकट खोब्रागडे, प्रितीताई कतलाम,प्रकाश गहाणे,भोजु लोगडे, गिताताई ब्राम्हणकर, ममता भैय्या,मंजुषा तरोणे, मिना शहारे, आशा नाकाडे,रत्नाकर बोरकर, राधेश्याम झोळे, राजहंस ढोक, वामण ब्राम्हणकर, दिपंकर उके,व अन्य मान्यवरांसह भाजपाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम संत महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दिपप्रज्वलीत करुन महीला महामेळाव्याची सुरवात करण्यात आली. यावेळी शुभांगी मेंढे यांनी ही महीला मेळाव्याला मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवुन भाजपाच्या काळातच महीला समृध्द झाल्या असुन विविध योजनेच्या माध्यमातुन त्यांना बळ मिळाल्याने महीला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले.यावेळी शारदाताई बडोले यांनी ही अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी राजकुमार बडोले यांनी महायुती सरकारच्या दमदार निर्णयाची माहीती देताना मातृशक्ती करीता खासदार, आमदार बनण्यासाठी आरक्षण, एस.टी.बसमधे अर्ध्या टिकीटीवर प्रवास,12 वी नंतर मुलींच्या उच्च शिक्षणासाठी राज्य सरकारची हमी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा असंख्य योजनेच्या माध्यमातुन महीलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने केलेल्या धाडसी निर्णयाची माहीती दिली.
गोठणगांव व चान्ना येथील अभुतपूर्व महीला मेळावे माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत विजयाची नांदी असणारे ठरले.