
वाशिम,दि.18 ऑक्टोबर ; जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय वाशिम व ग्रामीण रुग्णालय, मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांच्या मार्गदर्शनाखाली *कृषी महाविद्यालय, आमखेडा* येथे “ *तंबाखू मुक्त युवा अभियान*” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करून, त्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखूच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक परिणाम ,तंबाखूचे व्यसन रोखण्यासाठी असलेले विविध सरकारी उपाययोजना, टोल फ्री क्रमांक १८००११२३५६ , कोटपा २००३ , तसेच उपलब्ध उपचार पद्धतीं याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले
मानस शास्त्रज्ञ राम सरकटे यांनी विद्यार्थांना तंबाखूचे सेवन कश्या प्रकारे जडते तसेच तंबाखूचे सेवन केल्यामुळे मुख कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे विकार तसेच इतर गंभीर आजार होण्याची शक्यता कशी वाढते, या बाबत पोस्टर चित्राच्या आधारे मार्गदर्शन केले.
ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथील एनसीडी समुपदेशक प्रवीण गोरे यांनी विद्यार्थ्याना उच्च रक्तदाब व मधुमेह या असंसर्ग जन्य रोगाची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे उप प्राचार्य, प्रा . मानवतकर सर ,प्रा. कव्हर सर ,प्रा.मोरे सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी शपथ देऊन, त्यांनी स्वत: तसेच समाजाला तंबाखूच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधी जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली.