श्री. गुप्ता यांच्या चेक पोस्टला भेटी
भंडारा दि. 5 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली मतदारसंघाकरिता केंद्र शासनाकडून विजय कुमार गुप्ता, भाप्रसे, अप्पर सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, झारखंड सरकार यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे दिनांक 27 ऑक्टोबर, 2024 रोजी भंडारा जिल्हयात आगमन झालेले आहे.
विजयकुमार गुप्ता, सामान्य निवडणूक निरीक्षक यांनी मा. जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हयातील वरीष्ठ अधिकारी, निवडणूक विभागातील अधिकारी, निवडणूक नोडल अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेवून भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया व तयारी संबंधाने माहिती जाणून घेतली तसंच जिल्हयातील भौगोलीक परीस्थिती, वाहतुक, मतदान केंद्र, स्ट्रांग रूम, मनुष्यचळ इ. निवडणूक विषयक माहिती घेतली.
सामान्य निवडणूक निरीक्षक यांनी मतदान प्रक्रिया संबंधाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणा-या जनजागृती अभियानाची पाहणी केली. तसेच सुक्ष्म निरीक्षक, मतदान पथक यांचे प्रशिक्षण संबंधी माहिती घेतली.
सामान्य निवडणूक निरीक्षक यांनी भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62- साकोली मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मतदारसंघ, मतदान केंद्र, तपासणी नाका, स्थिर सर्वेक्षण पथक, फिरते पथक, चित्रिकरण पथक, संवेदनशिल भागांची पाहणी केली. तसेच उमेद्वारांचे नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी केली.
सामान्य निवडणूक निरीक्षक यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा व्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे योग्य प्रकारे पालन होत असल्याबाबत माहिती जाणून घेतली.