देवरी,दि.१५ – सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, गुणवंत विद्यार्थी, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज सेवकांना देवरी तालुक्यातील स्वर्गीय दलीरामजी डोमाजी निखाडे ( महाजन ) यांच्या जयंतीनिमित्त ५ जानेवारी २०२५ ला दुपारी ३ वाजता श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था शेडेपारच्या वतीने विविध पुरस्कारांचा अवाढव्य वितरण सोहळा आयोजित केला आहे.
शेडेपार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत होणा-या २०२५ च्या या अवाढव्य पुरस्कार वितरण सोहळ्यातील घोषित करण्यात आलेले पुरस्कार कर्ते समाजसेवक यामध्ये इंजिनिअर पवन दवंडे महाराज वरुड, अमरावती ( आदर्श कार्यगौरव समाजसेवक ), यादोराव पंचमवार माजी नगरसेवक देवरी ( पर्यावरण रत्न ), आयु. उमा किशोर गजभिये सेवानिवृत्त मुख्याध्यापिका गोंदिया ( कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव ), डॉ. धनंजय पर्बत, विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन नागपूर ( आदर्श कार्यगौरव समाजरत्न ), डॉ. जितेंद्र कुमार ठाकुर, शारीरिक शिक्षा निदेशक, राजीव गांधी महाविद्यालय, सडक अर्जुनी ( आदर्श शिक्षकरत्न ), जयपाल मारवाडे सौंदड ( प्रगतिशील शेतकरी शेतीरत्न ), सरबजीतसिंग भाटीया उद्योगपती देवरी ( युवा उद्योजक ), सुरेश चन्ने देवरी ( आदर्श पत्रकार दर्पणरत्न ), हर्ष मोदी सरपंच , सौंदड ( आदर्श नेता राजरत्न ), कु. प्राची मुनेश मदनकर, शेडेपार ( गुणवंत विद्यार्थी पुरस्कार ) आदींना सिल्वर मेडल, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजया निखाडे, इंजि. तिलक गावळकर, डॉ. घनश्याम निखाडे, संदिप गायधने, जितेंद्र चांदेवार, विश्वनाथ लांजेवार, हितेश हटवार, विनोद गावळ, मनोज सरजारे, सचिन राऊत, मिथुन चव्हाण आदींनी केले आहे.