सुशासन सप्ताहाचे उद्घाटन – जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांच्या हस्ते शुभारंभ

0
42

जलकुंभी वनस्पतीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जैविक जैविक तणाचा वापर

भंडारा,दि.18 : जिल्हा प्रशासनाच्या व कृषि विज्ञान केंद्र, साकोली यांचे संयुक्त विद्यमाने सुशासन सप्ताहा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जलकुंभी या जलीय तणाच्या निर्मूलनासाठी जैविक तराचा वापर करण्यात आला..या सप्ताहा अंतर्गत जलकुंभी या जलीय तासाच्या निर्मलणासाठी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, यांचे हस्ते करण्यात आले. निओचेटरीना  ब्रुची जैविक तण नियंत्रक एजस्ट जलकुंभी प्रादुर्भाव ग्रस्त भागामध्ये सोडण्यात आले.

          जलकुंभी (इकोरणीया स्पे.) या * पाण्यात वाढणाऱ्या तणांचा प्रादुर्भाव भंडारा जिल्हयातील तलावणे तसेच नदीमध्ये मोठयाप्रमाणावर आढळून येत आहे या जलिय तणामुळे पावसाळल्यामध्ये पुरपरिस्थीती निर्माण होत असते आणि या सोबतच मासे मारी करतांना सुध्दा मोठयाप्रमाणावर विपरीत परिणाम होत असतो. हे तण पाण्यात अतिश्य जलत गतीने वाढते आणि त्यामुळे त्या तणाचे नियंत्रण करणे कठीण होते.

              तसेच या तणाच्या व्यवस्थापनासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करणे खर्चीक तसेच संजीवासाठी हानीकारक सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासोबतच जे. सि बी.  किंवा  बोटीच्या सहाय्याने हे तण व्यवस्थापन अतिशय खर्चीक आहे

         या तणाच्या व्यवस्थापना- साठी जैविक एजंट (Biocompos  उपलब्ध आहे. निओचेटरीना ब्रुची असे या किटकाचे शास्त्री नाव असुण हा किटक (Host specific) फक्त जलकुंभी या तणावर जगतो. व या जैविक एजंट (Neochetina sip) च्या जिवण साखळी मध्ये चार अवस्था असतात. या अवस्थांमध्ये अंडी, अळी, कोष  आणि प्रौढ अशा चार अवस्था असुन अळी व प्रौढ अवस्था या  जलकुंभ तणाच्या व्यवस्थापनासाठी  काय करतात या जलकुंभी जलिय तणाच्या व्यवस्थापनासाठी कृषि विज्ञान केंद्र, साकोली येथील डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आणि डॉ प्रशांत उंबरकर विषय तज्ञ (किटकशास्त्र) यांनी निओचेटीना ब्रुची या जैविक एजंटचे Multiplication केले. आणि या बाबतीत भंडारा जिल्हयातील विस्तार अधिकारी, व शेतकरी यांना  प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले आहे आले.

             जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. लिना फलके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, श्रीमती.संगीता माने,उपविभागीय अधिकारी,गजेंद्रा बालपांडे, प्रकल्प संचालक डॉ. नितीन व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.