आमगाव,दि.२८ः-राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या मार्गदर्शनाख़ाली आमगाव तालुक्यातील गुरुकृपा आदिवासी आश्रमशाळा ठाणा येथे शाळेतील विद्यार्थांना तंबाखुविरोधी धडे ,आरोग्य शिक्षण व तपासणी करुन तंबाखु विरोधी अभियान राबविण्यात आल्याची माहीती मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यांनी दिली आहे.
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक हा संदेश लहान वयातच मुलांना मिळाल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल यासाठीच जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात आल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी यावेळी दिली.
सदर भेटीत मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम यानी विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन केले. त्यात प्रामुख्याने तंबाखु व्यसन, विद्यार्थ्याची सवय, मौखिक स्वच्छतेबाबत व सोडण्याच्या पद्धती यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
समुपदेशन करताना ०४ मुली व ०३ मूले तपासणीत व्यसन करताना आढळली.त्यांना व्यसन सोडण्यास प्रोत्साहित करण्यात आले.तसेच ०३ विद्यार्थी असे होते की ज्यांचे तोड़ उघड़ने बंद होत चालले होते त्याना केटीएस सामान्य रूग्णालयात उपचारा करीता संदर्भित करण्यात आले.
तंबाखू च्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन बक्षीस वितरित करण्यात आले.त्या मध्ये त्याना टीफीन बैग, लंच बॉक्स, कलर पेन, साधे पेन, पाणी बॉटल यासार्खे साहित्य वितरित करण्यात आले. अभियाना दरम्यान सर्व शिक्षक व विद्यार्थी याना तंबाखु मुक्तीची शपथ सामाजिक कार्यकर्ता संध्या संभरकर यानी दिली. तंबाखु विरोधी अभियानात मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांनी सहकार्य केले.