=मोफत आरोग्य शिबिर व समूह लोक नृत्य स्पर्धा
अर्जुनी मोर.-महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक मंडळ तावशी खुर्द च्या सौजन्याने शौर्य दिनाच्या शुभपर्वावर सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम 31 डिसेंबर 2024 ला आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त गंगाबाई मेमोरियल मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल अर्जुनी मोरगाव च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी रात्र साडेनऊ वाजता महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार भीम गीते व आदिवासी गोंडी नृत्य सामूहिक स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम 31 डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आला असून प्रमुख वक्ते म्हणून संविधान प्रचारक साकोली शब्बीर पठाण, संचित वाळवे, सुनीता कोकोडे, डॉ. अजय अंबादे व डिंपलताई पंधरेरे हे मार्गदर्शन करणार आहेत, तर रात्रौ साडे नऊ वाजता समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम बक्षीस सात हजार एक रुपये, द्वितीय बक्षीस पाच हजार एक रुपये, तृतीय बक्षीस तीन हजार एक रुपये ठेवण्यात आले आहेत, एक जानेवारी 2025 ला दुपारी दोन वाजता शौर्य दिनानिमित्त सामूहिक रॅली नागसेन बुद्ध विहार तावसी खुर्द येथून निघणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक मंडळ तावशी खुर्द यांनी केले आहे.