तुमसर:- तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पवनारा-कुरमुडा मार्गालगत जंगलात एक पट्टेदार वाघ (tiger) मृतावस्थेत आढळून आल्याची घटना ३० डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान वनविभागात (Forest Department) एकच खळबळ उडाली आहे.तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील पवनारा -कुरमुडा जंगलात आज सकाळी येथिल नागरिकांना एक वयक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्याने येथे नेमका वाघाचा मृत्यू(Death) कशाने झाला हे अद्याप कळु शकले नाही. घटना स्थळी तुमसर, भंडारा, व नागपुर येथिल वनविभागाची चमु दाखल झाली आहे. दरम्यान वाघाला बघण्यासाठी नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.