स्वच्छ भारत अभियानांतर्गत निकृष्ट दर्जाच्या सायकल व पेट्यांचे वितरण

0
263

गोंंदिया,दि.३०ःस्वच्छ भारत अभियानंअंतर्गत राज्यस्तरावरुन ओला व सुखा कचरा जमा करण्याकरीता ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आलेल्या तिनसायकिलसह पेट्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने त्या परत घ्यावे अशी मागणी माजी जि.प.सदस्य व खोडशिवनीचे सरपंच गंगाधर परशुरामकर यानी केले आहे.

स्वच्छ भारत व पाणी पुरवठा मंत्रालयाने राज्य स्तरावरुन गोंदिया जिल्ह्यातील ३०० ग्रामपंचायतींना तिनचाकीसायकली गावातील ओला व सुका कचरा जमा करुन वाहतूक करण्याकरीता देण्यात आल्या आहेत.त्या योजनेंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी ग्रामपंचायतीला २९ डिसेंबरला देण्यात आली.रविवार सुट्टीचा दिवस असल्यने सदर सायकल ग्रामपंचायत कर्मचार्यांने उतरवून ठेवून घेतली.आज सोमवार ३० डिसेंबरला सकाळी जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात त्या सायकलची पाहणी केली असता अत्यंत निकृष्ठ दर्जाची असून कचरा वाहतूकीकरीता ज्या पेट्या सायकलला लावण्यात आल्याचे बघून आश्चर्य वाटले.त्यामुळे संबधित विभागाने तिनचाकी सायकल वितरण करणार्या कंत्राटदारासोबत चर्चा करुन वितरीत केलेल्या पेट्या व सायकल परत मागवाव्यात अशी मागणी माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.