गरोदर व दोन स्तनदा मातांचे मृत्यु हे अत्यंत दु:खद घटना :-आमदार राजकुमार बडोले

0
195

= दोषींवर कठोर कार्यवाही करुन मृतकांच्या कुटुंबियांना 20 लक्ष रुपयाची तातडीने मदत द्या
= रुग्णांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागात तातडीने सुधारणा करा
अर्जुनी मोर.– तालुक्यात नोव्हेंबर ते डिसेंबर या एक महिण्याचे कालावधीत एका गरोदर मातेसह दोन प्रसुती झालेल्या स्तनदा मातांच्या मृत्युने तालुक्यासह संपुर्ण जिल्हा हादरला आहे. शासकीय आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या या मृत्यूमुळे संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 20 लाखाची मदत देण्यात यावी.तसेच यापुढे असे दुर्देवी घटना घडु नये यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेत आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या असी मागणी अर्जुनी मोर. विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री इंजी.राजकुमार बडोले यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांचेकडे केली आहे.

तसेच जिल्हाधिकारी गोंदिया,आरोग्य उपसंचालक नागपुर,तथा जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय गोंदिया यांनाही निवेदनाद्वारे अवगत केले आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यात आरोग्य विभागाच्या गलथान व निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटना या विभागातील आमदार राजकुमार बडोले यांनी गांभीर्यांनी घेतली असून मृतकांच्या कुटुंबाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा घटना समोर घडू नये यासाठी आरोग्य विभागात कठोर पावले व उपाय योजनेची गरज असून त्या संदर्भात आपण विधानसभेत याबाबत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार बडोले यांनी म्हटले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबी टोला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी वसंता धनराज नैताम 33 वर्ष या तीन डिसेंबरला दाखल झाल्या होत्या. मात्र सकाळी सहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांना ताडकळत या केंद्रात ठेवण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे दाखल करून त्यांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले. मात्र सदर गरोदर महिलेचा गोंदियाला पोहोचण्यापूर्वीच गोरेगाव जवळ मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील बीड/ भुरशी येथील अनिता रवी मेश्राम यांना 20 नोव्हेंबरला प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले. 21 नोव्हेंबरला सदर महिलेची शिजेरियन प्रसूती करण्यात आली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र लगेच दोन दिवसानंतर सदर महिला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे मृत पावली, या दोन महिलांच्या मृत्यूची शाई वाळते न वाळते लगेच तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे रागिनी अनिल मसराम वय 25 वर्ष ही महिला सहा डिसेंबरला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेथील डॉक्टरांनी रात्रौ दहा वाजता सदर महीलेची नॉर्मल प्रस्तुती केली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुतीनंतर टाके लावताना चुकीच्या पद्धतीने टाके लावण्यात आल्याने महिलेच्या प्रकृतीत गंभीर परिणाम झाला. लगेच तिला गोंदिया सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले. तिथून नागपूरला हलविण्यात आले. नागपूर येथे भरती केल्यानंतर तपासणी अंतिम टाके लावताना शौचाची नळी फाटल्याने सदर महिलेच्या शरीरात संसर्ग झाल्याने तिच्या किडनी व मेंदू वरती आघात झाल्याचे सांगण्यात आले. तब्बल 26 दिवसानंतर नागपूर मेडिकल मध्ये आज 31 डिसेंबर रोजी सदर महिलेचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही घटनांमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यासह गोंदिया जिल्हा हादरला असून आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणामुळे गंभीर प्रश्न निर्माण होऊन गोरगरीब रुग्णाच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
या घटनांची या विभागाचे आमदार राजकुमार बडोले यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबत त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री व संबंधितांना पत्र व्यवहार सुरू केला आहे. आरोग्य मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रस्तुती नंतर सौ रागिनी अनिल मसराम यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंब जनावर मोठा आघात झाला आहे .प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच मृत्त महिला यांच्या कुटुंबास प्रत्येकी 20 लक्ष रुपयाची आर्थीक मदतीची त्वरित मंजुरी देण्यात यावी जेणेकरून त्यांच्या उद्भवलेल्या अडचणींना काहीसा दिलासा मिळेल. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी कोरंबी टोला, अर्जुनी मोर येथील रुग्णालयात देखील याच प्रकारची गंभीर घटना घडली होती. यापुढे असे दुर्दैवी प्रसंग घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावे सदर घटना न घडण्याच्या दृष्टीने रुग्णालय आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासंदर्भात योग्य निर्देश देवुन, रुग्णाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना घेतल्या जाव्यात अशी मागणी ही अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केली आहे.