गोरेगाव,दि.०१ःगोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रंजीत सरोजकर यांची पत्नी श्रीमती कला रंजीत सरोजकर जांभुळकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सहपरिवार शाल श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला .
स्व.लक्ष्मणराव मानकर गुरुजी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा वडगाव जंगली तालुका सेलू जिल्हा वर्धा येथील सभागृहामध्ये निरोप समारंभ कार्यक्रम मुख्याध्यापक के.पी. भोंगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.प्राचार्य नागदेवे,पत्रकार रंजीत सरोजकर,पूनम सरोजकर तथा शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सेवानिवृत्त शिक्षिका के.बी.जांभुळकर सरोजकर यांचा कार्यकाळ आणि शाळेला सेवा दिल्याबद्दल सर्व शिक्षकांनी कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र पांढरे यांनी केले.आभार श्री.महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता बाविस्कर सर,वाघ सर, जयपूरकर सर, खिरडकर सर, गुरडकर सर, वेरूळकर सर ,रामटेके सर ,घोडेश्वर सर, शंभरकर सर ,डांगे सर, दुशंत मसराम सर .सोनाली वानखेडे मैडम, पद्मा सातपुते मॅडम सुकेसणी कुंभारे मॅडम ,माधुरी मडावी मैडम, सराम मॅडम ,आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य केले.