भंडारा,दि.०३ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या ग्राम सुकळी (महालगाव) ता.साकोली येथील निवासस्थानी भेट देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी शोकाकुल परिवाराचे सांत्वन केले.काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांच्या मातोश्री स्व. मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे दुःखद निधन झाले. या निमित्त खासदार प्रफुल पटेल यांनी आज पटोले परिवाराला सांत्वना देत या दुःखद घटनेला सहन करण्याची ईश्वर शक्ति प्रदान करो अशी प्रार्थना केली. यावेळी सर्वश्री नानाभाऊ पटोले, सुनिल फुंडे, विनोद पटोले सहीत परिवारातील सदस्य व अन्य उपस्थित होते.