गोंदिया-सध्या चीनमध्ये “एचएमपीव्ही” उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे व श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारखा) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यता आरएसव्ही आणि फ्ल्यु प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वांनखेडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करण्याविषयी पत्र देण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील लोकांनी सावधता बाळगणे गरजेचे बनले आहे.ताप किंवा सर्दी असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच सार्वजनिक ठिकाणी ईतरत्र कुठेही थुंकु नये व शिंकताना किंवा खोकताना रुमालाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचित्सक डॉ.अमरिष मोहबे,अतिरिक्त जिल्हा शल्यचित्सक डॉ.तृप्ती कटरे व सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी केले आहे.
सर्वसाधारण फ़्लु,सर्दी,ताप,अंगदुखी व खोकला अशी लक्षणे आहेत.सहव्याधी असणारे रुग्ण,ज्येष्ठ नागरिक,लहान मुलं आणि उपचारामुळे इम्युनिटी कमी झालेले रुग्ण यांना या विकाराचा धोका असू शकतो प्रसंगी न्युमोनिया सारखी गुंतागुंत होऊ शकते.
एचएमपीव्ही विषाणु हा अतिजोखमीच्या खालील दिलेल्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरूप धारण करु शकतो – एचएमपीव्ही विषाणुची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तिला होऊ शकते.मात्र या आजाराचा धोका खालील व्यक्तींना जास्त होवु शकतो.हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिला होवु शकतो.
१) ५ वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके)
२) ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक.
३) गरोदर माता.
४) उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग.
५) मधुमेह स्थूलत्व.
६) फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती.
७) चेता संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती.
८) प्रतिकार शक्तीचा -हास झालेली व्यक्ती.
९) दीर्घ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्ती.
एचएमपीव्ही विषाणु आजार कसा पसरतो-
हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तिपासुन दुसर्या व्यक्तिला होवु शकतो.जो गंभीर असु शकतो. खुप उशिर होण्यापुर्वी काळजी घ्या.
- व्यक्ती ते व्यक्ती
- खोकणे आणि शिंकणे यातुन श्वासाद्वारे
- हात आणि पृष्ठभागावर पडलेले थेंब
एचएमपीव्ही विषाणु आजार टाळण्यासाठी हे करा
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिशू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्या.
- धुम्रपान टाळा.
- पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
एचएमपीव्ही विषाणु बाबत हे करु नका –
- हस्तांदोलन करणे टाळा.
- आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
- टिश्यु पेपरचा पुर्नवापर टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
- फल्यू सद्रृश लक्षणे असलेल्या व्यक्तीने घरात जर कोणी अति जोखमीचे आजार असणारे असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये.
- वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत.
- आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.