अर्जुनी मोरगाव -विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलजी यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेमधे रोजगार निर्मिती, क्षेत्रातील सिंचन योजना, पर्यटन विकास व शेतकर्यांना किमान बारा तास दिवसा वीज मिळावी इत्यादी महत्वाच्या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. लवकरच याबाबत आपण सरकार सोबत चर्चा करून संयुक्त बैठक घेऊन विषय मार्गी लावू असे आश्वासन प्रफुल पटेल यांनी राजकुमार बडोले यांना दिले. प्रफुलभाई पटेल यांच्या विकासात्मक कार्यशैलीचा गोंदिया जिल्हा आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला लाभ होत आला असुन पुढे देखील ही वाटचाल सुरू राहील असा ठाम विश्वास राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.