मग्रारोहयोच्या माध्यमातुन ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य करा :- आम.राजकुमार बडोले

0
231

अर्जुनी मोर.–मग्रारोहयो ही योजना ग्रामविकासाची नांदी ठरत आहे.पंचायत समीती,वनविभाग,महशुल ,लघु पाटबंधारे,अशा विविध यंत्रनेच्या माध्यमातुन या योजनेची कामे केली जातात,या योजनेत येणारे अडथडे सर्व विभागांनी समन्वयातून दुर करुन ही योजना पारदर्शक व यशस्वीपणे राबवावी,या योजनेतुन अर्जुनी मोर. तालुक्यात केवळ एकच गोडाऊनचे काम सुरु आहे.मात्र या योजनेतुन पुन्हा मोठ्या प्रमाणात गोडाऊन कसे तयार होतील.याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.त्यासाठी मग्रारोहयोच्या माध्यमातुन ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य करा असे आवाहन आमदार राजकुमार बडोले यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक ०९ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती सभागृह अर्जुनी-मोर येथे संपन्न झाली.त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन आमदार राजकुमार बडोले बोलत होते.
या बैठकीत योजनेंतर्गत सुरू असलेल्या आणि प्रलंबित कामांचा आढावा घेत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक स्तरावर येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून गावांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याचे सुचना केल्या. सोबतच योजना यशस्वीरीत्या राबवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशंवत गणवीर, पंचायत समिती सभापती सविताताई कोडापे, उपसभापती होमराज पुस्तोडे, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे, जिल्हा परिषद सदस्या कविताताई कापगते,तहशिलदार अनिरुद्ध कांबळे , गटविकास अधिकारी शंकर वैद्य, राॅकाचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, पंचायत समिती सदस्य सर्वश्री डाॅ नाजुक कुंभरे, नुतनलाल सोनवाने, संदिप कापगते, प्रमोद लांडगे, घनशाम धामट, फुलचंद बागडेरीया, आम्रपालीताई डोंगरवार, भाग्यश्रीताई सय्याम, कुंदाताई लोगडे, शालिनीताई डोंगरवार, पुष्पलताताई दुग्रकर, चंद्रकलाताई ठवरे, संरपच संघटना तालुकाध्यक्ष भोजराज लोगडे, नंदकिशोर गहाणे, दादा संग्रामे, किशोर ब्राम्हणकर, पराग कापगते सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.