भंडारा,दि.15 : भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सेवेच्या उत्तम कामकाजानुसार येरली, वडद व लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. NABH व्दारे (National Accreditation Board of Hospitals and Healthcare Providers) चा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी उच्च दर्जाच्या गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि त्यांची मूल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित करणे असतो. NABH प्रमाणपत्र मिळण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील ३ आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये येरली, वडद व लाखोरी हे आयुर्वेदिक दवाखाने होते. यातील येरली व वडद दोन्ही दवाखान्याचे NABH प्रमाणपत्र पहिल्या टप्यात प्राप्त झाले तर आयुर्वेदिक दवाखाना लाखोरी ला दुसऱ्या टप्यात NABH प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
तसेच कायाकल्प कार्यक्रम किंवा कायाकल्प मूल्यांकन ही एक सरकारी योजना आहे जी भारतातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये स्वच्छता,आरोग्य आणि संसर्ग नियंत्रण साधनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सुरू केली गेली आहे.
या कार्यक्रमात रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी पुरस्कार देणे हा असून या मध्ये रुग्णालयातील जागांचा, वॉर्डचा, बाथरूमचा आणि वैद्यकीय उपकरणांचा स्वच्छतेचा दर्जा, कचरा व्यवस्थापन आणि त्याची विल्हेवाट, स्वच्छतेसाठी आवश्यक सुविधा आणि त्यांचे व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजना (उदा. उपकरणांचे निर्जंतुकीकरण, कर्मचारी यांचे स्वच्छता पद्धती),रुग्णांची स्वच्छतेबाबत समाधान अशा विविध पैलूंवर रुग्णालयांचे मूल्यांकन केले जाते. कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामीण रुग्णालय अड्याळ, सिहोरा व लाखांदूर या पाच रुग्णालयांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
तसेच जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना व २९ उपकेंद्रांना सन 2023-24 चे कायाकल्प पारितोषिक प्राप्त झाले आहे.या कायाकल्प कार्यक्रम प्रमाणेच राष्ट्रीय आयुष्य अभियान अंतर्गत आयुर्वेदिक दवाखाण्याचे NABH प्रमाणपत्र (रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ प्रमाणपत्र) हा भारत सरकारच्या Quality Council of India (QCI) अंतर्गत कार्यरत असलेला एक मान्यता बोर्ड आहे.
10 जानेवारी, 2025 रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ पितांबर तलमले यांना निवासी जिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्या हस्ते NABH प्रमाणपत्र (रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ प्रमाणपत्र) देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .मिलिंद सोमकुंवर, जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक प्रभारी डॉ .भास्कर खेडीकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक लांजेवार यांची उपस्थिती होती.