आठव्यांदा बोरकन्हारच्या सुपुत्राची राजधानी दिल्ली परेड साठी निवड

0
620

*▪️राजेश कृष्णा तुरकर आज दिल्लीच्या कर्तव्यपथावर (राजपथ) झळकणार*

सालेकसा– राजधानी दिल्ली येथे गणतंत्रदिनी कर्तव्यपथावर (राजपथावर) चालणाऱ्या थल सेनेच्या तुकडीत परेडमध्ये आमगांव तालुक्यातील बोरकन्हार येथील वीर सुपुत्र राजेश कृष्णा तुरकर यांची तब्बल आठंव्यांदा परेडमध्ये निवड झाली आहे. परेडमध्ये आठंव्यांदा निवड होणारे राजेश कृष्णा तूरकर हे जिल्ह्यातील एकमेव जवान असून संपूर्ण जिल्हयासह राज्यासाठी हे गौरवास्पद आहे.
आमगांव तालुक्यातील छोट्याशा खेडेगावांतून कठीण परिश्रम करून थल सेने पर्यंतचे यशोशिखर राजेश कृष्णाजी तूरकर यांनी गाठले आहे. इवनीट ६१ कॉवलरी ही कर्तव्यपथावर (राजपथावर) चालणार असून त्यात राजेश कृष्णा तुरकर यांची आठव्यांदा निवड करण्यात आली आहे. राजेश कृष्णा तुरकर हे थल सेनेमध्ये सेवा देत असून त्यांचे सेनेतील सेवे बरोबरच खेळातहि नाविन्य प्राप्त असल्याने त्यांनी अनेक मेडल मिळविले आहे. तसेच हॉर्स रॉईंडींग (घुडसवारी) मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१७ मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. त्याचबरोबर २०१८ मध्ये आर्मी चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल आणि २०२१ मध्ये सिल्व्हर मेडल प्राप्त केले. तसेच १९७१ युद्धाचे जनरल फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ वर बनवण्यात आलेली चित्रपटामध्ये श्याम बहादुर या चित्रपटाचे अभिनेता विकी कौशल सोबत या चित्रपटात राजेश यांनी काम केलेलं आहे. या उल्लेखनीय कामगिरीसाठी राजेश कृष्णा तुरकरला प्रशस्तीपत्रांनी सन्मानित करण्यात आले. तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात राजेश कृष्णा तुरकर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.