पालकमंत्री संजय सावकारे , कामगार मंत्री श्री . फुंडकर यांची आयुध निर्माणीला भेट व पाहणी

0
69

लक्ष्य हॉस्पिटलला भेट देऊन केली जखमींची  विचारपूस

भंडारा  दि.25 जिल्ह्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माणीमध्ये काल घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात कामगार अधिनियम अन्वये कामगार हिताच्या दृष्टीने योग्य त्या सुरक्षा व्यवस्था देखील निर्माण असाव्यात, असे  निर्देश पालकमंत्री संजय सावकारे व कामगार मंत्री आकाश फुंडकर   यांनी आज आयुध निर्माणी प्रशासन व जिल्हा प्रशासनाला दिले.दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

 पालकमंत्री संजय सावकारे आणि कामगार मंत्री यांनी कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले आहे.यावेळी दोन्ही मंत्री महोदयांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच ही दुर्दैवी घटना होण्यामागे काय शक्यता असाव्यात याबाबत देखील आयुध निर्माणी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भविष्यात अश्या दुर्घटना टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी दिले.

            आजच्या पाहणीत पालकमंत्री संजय सावकारे यांनी आयुध निर्माणीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांची संख्या, त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती, तसेच जखमींवरील उपचारांविषयी विचारणा केली. याशिवाय, जखमींची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला आणि तातडीने उपचारांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.