पवार महिला समितीद्वारे हळदी कुंकु कार्यक्रम

0
66

गोंदिया : पवार महिला समितीच्या वतीने पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन २६ जानेवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला समिती अध्यक्षा आरती पारधी होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात राजाभोज, गढकालिका माता व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दुर्गा संजय ठाकरे, रंजू सचिन रहांगडाले, शैफाली शैलेश बिसेन, दिप्ती घनश्याम पटले, मोहिनी उमेद बोपचे, राजकुमारी रुपेंद्र कटरे, शिल्पा सुनिल पटले, सुनिता विनोद कटरे, इंद्रायणी मूनेश रहांगडाले, सीमा राहुल हरीनखेडे, शोभिका राजेन्द्र बिसेन, लक्ष्मी नरेंद्र ठाकूर, कुंतन फुलिचंद पटले, प्रतिभा झुमकलाल रहांगडाले, कविता चौधरी, शितल छनेंद्र पटले, जानकी पारधी, रेखा राजेश बीसेन, पूजा रमेश टेंभरे, संतोषी रहांगडाले, छाया रहांगडाले, हरीणखेडे, राधा पंकज चौधरी, ममता येळे, डॉ.त्रिवेणी घनश्याम बघेले, रेखा चौधरी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तरित्या सहभाग घेवून आनंद साजरा करण्यात आला. यानंतर महिलांना वाण वाटप करâन हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दुर्गा संजय ठाकरे यांनी तर आरती पारधी यांनी आभार व्यक्त केले.